लोकदर्शन 👉मोहन भारती
राजुरा (ता.प्र) :– इन्फंट जिजस सोसायटी या शहरातील नामांकित संस्थेअंतर्गत इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूलची राजुरा येथे इयत्ता १० वी सीबीएसई आणि स्टेट शाखेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यात सीबीएसई शाखेत शाळेतून प्रथम येणारा प्रज्वल आर. तुराणकर ने ९७. २%, द्वितीय कु. सुखदा जितेंद्र देशकर ने ९४. ८%, द्वितीय तर हर्ष एस. चव्हाण ने ९३. २%, चतुर्थ कु. श्रावणी एन. लिखार ने ९१. ६% आणि पाचवा अनिस मधुकर साळवे ने ९१. ४ % आणि स्टेट शाखेत इयत्ता दहावीत शाळेतून प्रथम कु. वैष्णवी बोढेकर ८९ %, द्वितीय पार्थ शेंडे ८८.६०%, तृतीय प्रणय आकनूरवार ८७.८० %, चतुर्थ कस्तुरी नामेवार ८६.८०% पाचवी सलोनी आगलावे ८६.८०% गुण व क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांसह अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे सचिव तथा नगराध्यक्ष अरुण धोटे, शाळेचे संचालक अभिजित धोटे, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संतोष सागर यांनी तर आभार उनप्रदर्शन सुशिल वासेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.