लोकदर्शन 👉मोहन भारती
राजुरा :– दिनांक १३ जुलै रोजी राजुरा तालुक्यातील मौजा चिंचोली बुद्रुक येथे हैदराबादकडे जाणारी लक्झरी ट्रॅव्हल्स पुराच्या पाण्यात अडकली होती. या मध्ये ३५ प्रवासी अक्षरशः मृत्यू च्या दारात उभी होती. अशातच चिंचोली बुद्रुक येथील पोलीस पाटील यांनी गावातीलच खुशाल पोचू हुडे यांना ही माहिती दिली आणि खुशाल हूडे यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी पुराच्या पाण्यात जाऊन स्वतः च्या जीवाची पर्वा न करता, हातामध्ये रोप घेऊन ट्रॅव्हल्स मधील प्रवाश्यांना रोपच्या साह्याने पोलीस प्रशासनाच्या व गावकऱ्यांच्या सहकार्याने सुखरूप बाहेर काढले. जवळपास दोन तासाच्या प्रयत्नानंतर सगळ्यांना त्यांनी सुखरूप बाहेर काढून प्राण वाचवले. त्यांच्या या अदम्य साहस आणि शौर्य च्या कामगिरीबद्दल कळमनाचे सरपंच तथा काँग्रेस ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा अखिल भारतीय सरपंच संघटनेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांनी श्री खुशाल हूडे यांची चिंचोली बु येथे भेट घेऊन शाल, श्रीफळ देऊन ओबीसी काँग्रेसच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार केला.
या प्रसंगी बनारी भोई समाजाचे कार्यकर्ते कृष्णाजी भोयर, माजी शिक्षण विस्तार अधिकारी गंगाधर गणपती वाघाळे, बनारी भोई समाजाचे अध्यक्ष, वर्षा आनंदराव तावडे, ग्रामपंचायत सदस्य बालाजी हुडे, सोनिया बालाजी हुडे, बंडू मोटघरे, संभा वाघाडे, अजय गेडाम, दादाजी बावणे, बंडू हुडे व इतर मान्यवर उपस्थित होते.