इन्फंट कान्व्हेंट चा साकेत देशकर आॅलम्पिअॅड परिक्षेत राज्यातून पाचवा.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा (ता.प्र) :– इन्फंट जिजस सोसायटी अंतर्गत इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूलची राजुरा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायन्स आॅलम्पिअॅड फाऊंडेशन नवी दिल्ली द्वारा आयोजित परिक्षेत महाराष्ट्र आणि गोवा झोन मधून पाचवा तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आठवा क्रमांक पटकाविणाऱ्या साकेत देशकर या विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांचे हस्ते करण्यात आले. साकेत देशकर यास कास्य पदक, १ हजार रुपये रोख व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यासोबतच सिल्व्हर झोन आॅलम्पिअॅड नवी दिल्ली आणि क्रिएटिव्ह माईंड्स आॅलम्पिअॅड फाऊंडेशन हैदराबाद परिक्षेत विविध विषयात यशस्वी झालेले अर्श वाघमारे, सोहम चौधरी, विवेक पवार, शरवरी उराडे, विधान बानकर, नकुल अटाळकर, तन्मय मुंगमोडे, दिव्यांशु लोढे, मन रामटेके, आयना शेख यांना सुवर्णपदक व प्रमाणपत्र कायनाथ अहमद, विवेक पवार यांना रोप्य पदक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे सचिव तथा नगराध्यक्ष अरुण धोटे, शाळेचे संचालक अभिजित धोटे, सीबीएसई शाखेच्या मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, स्टेट शाखेच्या मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, मार्गदर्शक शिक्षिका विद्या चौधरी यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *