लोकदर्शन 👉 मोहन भारती
नंदकिशोर वाढई यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.
राजुरा (ता.प्र) :– राज्यामध्ये महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हापरिषद पंचायत सिमिती, ग्रामपंचायत अशा विविध निवडणुका होऊ घातलेल्या आहे. त्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवणे आवश्यक आहे. माननीय सुप्रीम कोर्टा मध्ये ओबीसीची बाजू भक्कम मांडून आरक्षण कायम ठेवण्याचा प्रयत्न करावा, सर्व पक्षाने पुढाकार घेऊन ओबीसी आरक्षण पूर्ववत लागू करण्यासाठी प्रयत्न करावे किंवा तसे न झाल्यास माननीय सुप्रीम कोर्टाने कठोर भूमिका घेतल्यास ज्या सर्वसाधारण गटासाठी आरक्षित जागा आहेत त्यामध्ये ओबीसी बांधवाना जास्तीत जास्त वाटा प्राप्त व्हावा अशी बहुसंख्य ओबीसी बांधवाची मागणी आहे तसे आपण स्वतः ओबीसीच्या लढ्यासाठी अनेकदा संघर्ष केला आहे आणि करीत आहात तेव्हा ओबीसी बांधवाना आपल्या व काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी काँग्रेसचे ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना निवेदनाद्वारे केली आहे.
श्री. पटोले हे राजुरा विधानसभा क्षेत्रातील अतिवृष्टी व पुरपरीस्थिती पाहणी दौऱ्यावर आले होते. या दरम्यान वाढई यांनी त्यांनी ही मागणी केली आहे. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी तालुकाध्यक्ष दादा पाटील लांडे, जेष्ठ नेते विजयराव बावणे, अॅड. सदानंद लांडे, दौलतराव भोंगळे, अॅड. अरूण धोटे, कुंदाताई जेणेकर, ए. डी. एकडे, निलेश संगमवार, विक्रम येरणे, प्रा. आशिष देरकर, उमेश राजूरकर, मंगेश गुरणुले यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.