लोकदर्शन 👉 मोहन भारती
*⭕भाजपा आदिवासी आघाडी कोरपना चा पुढाकार*
कोरपना :तालुक्यातील रूपापेठ येथे भारताच्या 15 व्या राष्ट्रपती, पहिल्या देशातील आदिवासी महिला श्रीमती द्रौपदीजी मुर्मू यांची प्रतिमा ग्रामपंचायत कार्यालयाला भेट व कोरपणा तालुका भाजपा आदिवासी आघाडी च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. नारायणजी हिवरकर भाजपा कोरपना तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष हे होते. तर उदघाटक म्हणून कोरपना तालुक्यातील आदिवासी नेते श्री. अरुणजी मडावी हे होते,
विशेष अतिथी श्री. सतीशभाऊ उपलेंचीवर विस्तारक राजुरा विधानसभा तथा माजी नगरसेवक गडचांदूर हे होते ,भाजपा युवा नेते,श्री. निलेश भाऊ ताजने, श्री. हरिभाऊ घोरे,श्री. पुरुषोत्तम जी भोंगळे भाजपा तालुका उपाध्यक्ष, जेष्ठ नेते श्री. लोडबाजी इंगळे, पारडी चे माजी सरपंच श्री. रामदास कुमरे, आदिवासी युवा नेते, हिरापूरचे माजी सरपंच श्री. प्रमोद कोडापे हे होते,श्री. दिनेश सूर भाजपा युवा जिल्हा सचिव, श्री. दिनेश खडसे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आदिवासी नेते श्री. अरुणजी मडावी यांनी आपल्या मनोगतात 75 वर्षाच्या इतिहासात प्रथमत देशाच्या सर्वोच्च मोठया राष्ट्रपती पदापर्यंत पोहचण्याची संधी आदिवासी समाजाला देशाचे पंतप्रधान श्री. नरेंदजी मोदी साहेब यांच्या मुळे मिळाली हे आदिवासी बांधवांनी विसरू नये असे सांगितले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता रूपापेठ येथील जेष्ठ नागरिक आदिवासी नेते श्री. नामदेव पाटील आत्राम,माजी सरपंच श्री. लक्ष्मण चाहकाटे, भाजपा आदिवासी आघाडी चे कोरपना तालुका अध्यक्ष श्री. मनोज भाऊ तुमराम,श्री. शामराव पा. मंगाम, श्री. अर्जुन वलके, कवडू मडावी, तुकाराम गेडाम,श्री. किशोर तलांडे आदिनी सहकार्य केले.