अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन,आवारपूर द्वारा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन👉गडचांदूर,,(प्रा, अशोक डोईफोडे)

युवा हे देशाचे आधारस्तंभ असून शिक्षण हे देशाच्या विकासासाठी मुख्य शस्त्र आहेत. तसेच वर्ग १० वा व वर्ग १२ वी हे युवकांच्या जीवनातील टर्नींग पाईंट आहेत व या दोन्ही कक्षामध्ये बोर्डाची परीक्षा घेत असते या परीक्षेत जास्तीत- जास्त यश संपादन केले पाहिजेत हे विचारात घेता अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन आवारपूर ने २०२१- २०२२ या सत्रात वर्ग १० वा व वर्ग १२ वि मध्ये मेरिट मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम घेतला. यात नजीकच्या गावातील १० व्या (मराठी, इंग्लिश व सेमी इंग्लिश) या वर्गातील एकूण १० विद्यार्थ्यांचा आणि १२ व्या (सायंन्स,आर्ट व एम.सी.व्ही.सी) या वर्गातील ९ विद्यार्थ्यांचा प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देऊन, अल्ट्राटेक आवारपूर चे युनिट हेड, श्रीराम पी.एस., उपाध्यक्ष गौतम शर्मा, माईन्स हेड, संदीप घोष व महाव्यवस्थापक कर्नल दिपक डे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला श्री. शिवाजी इंग्लिश स्कूल, नांदा, श्री. प्रभू रामचंद्र विद्यालय नांदा, माउंट पब्लिक स्कूल, नांदा, पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालय, आवारपूर, महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर आणि जिल्हा परिषद हायस्कूल बाखर्डी येथील यशस्वी विद्यार्थी व शिक्षक व पालक यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमा दरम्यान सर्वांना नाश्ता व स्विट प्रदान करण्यात आले.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमात अल्ट्राटेक आवारपूर चे युनिट हेड, श्रीराम पी. एस.यांनी पुस्तकी ज्ञानासोबतच शीस्त ही महत्त्वाची आहे, त्यांच्या जोरावर आपण प्रगती करू शकतो असे मनोगत व्यक्त करत सर्व मुलांना शुभेच्छा दिल्यात आणि कर्नल दिपक डे यांनी आपल्या भाषणातून सांगीतले की अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन आवारपूर च्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सहकार्य करू.

या कार्यक्रमात सी.एस.आर. प्रमुख सतीश मिश्रा, सचिन गोवारदीपे, डॉ गोदावरी नवलानी, संजय ठाकरे, देविदास मांदळे यांची उपस्थिती होती.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *