लोकदर्शन👉 मोहन भारती
श्रीमती सोनिया गांधींच्या समर्थनार्थ राजुरा येथे काँग्रेसचे शांततापूर्ण सत्याग्रह.
राजुरा (ता.प्र) :– केंद्र सरकारने आपले अपयश लपविण्यासाठी, सरकारचे चुकीचे निर्णय, धोरण, वाढती महागाई, बेरोजगारी व जनसामान्यांच्या मुलभूत समस्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने यंत्रणेला हाताशी धरून काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्यावर राजकीय सुळबुद्धीने ईडी ची कार्यवाही चालवली असून त्यांना नाहक त्रास देत आहेत. यामाध्यमातून विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे हुकुमशाही, दडपशाही वादी मोदी सरकार विरोधात जनतेमध्ये रोष आहे. सरकारने हे सर्व गैरवापर थांबवावे असे मत आमदार सुभाष धोटे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार संविधान चौक राजुरा येथे एक दिवसीय शांततापूर्ण सत्याग्रह आंदोलन प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले. या प्रसंगी भर पावसात देखील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काँग्रेसप्रेमी नागरिकांनी घोषणाबाजी करून सोनिया गांधी यांच्यावरील कार्यवाहीचा निषेध नोंदविला.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, कविता उपरे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, शहराध्यक्ष संतोष गटलेवर, संध्या चांदेकर, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्णेवार, ओबीसी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, माजी जि प सदस्य मेघाताई नलगे, माजी सभापती कुंदाताई जेणेकर, निर्मला कुडमेथे, माजी नगरसेवक हरजितसिंग संधू, गजानन भटारकर, अशोकराव देशपांडे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक राव, प्रभाकर येरणे, राजु पिंपळशेंडे, रामभाऊ ढुमने, उमेश गोरे, अॅड चंद्रशेखर चांदेकर, विकास देवाळकर, धनराज चिंचोलकर, राजाराम येल्ला, अनंता एकडे, चेतन जयपुरकर, सय्यद साबीर, पूनम गिरसाळवे, योगिता भोयर, प्रियदर्शनी उमरे, सुप्रिया गेडाम, ज्योती शेंडे, इंदूताई निकोडे, धनराज चिंचोलकर, कवडु सातपुते, इर्शाद शेख, चेतन जयपुरकर, विनोद कावडे, संदीप घोटेकर, आकेश चोथले, भारत रोहने, निरज मंडल, मारोती मोरे, सुरेंद्र वेलादे यासह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आणि युवक, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.