लोकदर्शन 👉किरण कांबळे
आज दिनांक २८/०७/२०२२,
“गौतम आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह बोरिवली मुंबई (प.)” या ठिकाणी होत असलेल्या धरणा आंदोलनाला “भारतीय विद्यार्थी मोर्चा” तसेच त्यांचे सहकारी संघटनेचे प्रतिनिधी यांनी आज त्या ठिकाणी भेट दिली.
या ठिकाणी मागील तीन वर्ष प्रशासनाच्या भोंगळ कारभार आणि निष्काळजी पणामुळे मुलांच्या परीक्षा सुरू असताना वस्तीगृहातील तब्बल दीडशे आदिवासी विद्यार्थ्यांना वस्तीगृह ताबडतोब खाली करण्याचा आदेश संबंधित प्रशासनाकडून दिला आहे. त्याचसोबत पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून दडपशाही करण्याचा प्रयत्नदेखील केला गेला आहे. सोबतच विद्यार्थ्यांना सुयोग्य पर्यायी व्यवस्थाच आतापर्यंत केली गेलेली नाही आहे. व आजच्या तारखेला तेथील मुलभुत गरजा पाणी वीज पंखे देखील बंद केल्याने विद्यार्थ्यांची खूप मोठी पिळवणून व शोषण होत आहे.
या ठिकाणी परिस्थिती बघता मा.सुमित शिंदे (राज्य महासचिव हॉस्टेल एवं अभ्यासिका महाराष्ट्र ) यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मानसिक पाठिंबा देण्यात आला, सोबत महाराष्ट्र प्रशासनाला येत्या दहा दिवसांत विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे इमारत देऊन सुयोग्य सोय केली गेली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय विद्यार्थी मोर्चा व राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ या संघटनेच्या वतीने या विरोधात आंदोलन छेडलं जाईल व या संपूर्ण परिस्थितीला महाराष्ट्र शासन व आदिवासी विकास विभाग जबाबदार असेल असे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित ठिकाणी मा.साजिद जहागिरदार (भारतीय युवा मोर्चा मुंबई जिल्हाध्यक्ष) , मा.अजय वंजारा (राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ मुंबई जिल्हा संयोजक), मा.श्रद्धा जैस्वार (प्रदेश अध्यक्षा भारतीय विद्यार्थी छात्र प्रकोष्ठ महाराष्ट्र) मा.फय्याझ शेख (BYM मुंबई)हे वेगवेगळ्या विद्यार्थी युवा संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.