लोलदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे रूग्णांसाठी सोनोग्राफी मशिन उपलब्ध असुन सुध्दा त्याचा उपयोग शुन्य आहे. तसेच रूग्णालयातील गरोदरमाता रूग्णांना चंद्रपूर येथे सोनोग्राफीसाठी अनेक वेळेस स्थलांतरीत करण्यात येते. अनेकदा रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते परंतु रुग्णालयात रक्त संकलन मशिन नसल्यामुळे त्यांना सुध्दा रक्तासाठी चंद्रपूर किंवा इतरत्र भटकंती करावे लागते अशा अनेक समस्यांमुळे राजुरा परिसरातील रूग्णांना त्रास होत आहे.
तेव्हा सदर समस्या सोडविण्यासाठी जनतेचा नाहक त्रास वाचविण्यासाठी, रुग्णांना योग्यवेळेस योग्य निदान मिळण्याकरिता उपजिल्हा रुग्णालय राजुराला जवकरात लवकर तज्ञ डॉक्टर MD (Redio Diagnosis) आणि MS (Obstetrics and Gynaecology) यांची नियुक्ती करणे आणि रक्त संकलन मशिन उपलब्ध करून द्यावी अशी मागणी राजुरा तालुका युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक राव यांच्या वतीने आमदार सुभाष धोटे यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या प्रसंगी सेवादल काँग्रेस अध्यक्ष दिनकर कर्णेवार आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.