लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– राज्यात सध्या मुसळधार पावसाने चांगलाच हैदोस घातला असून अतिवृष्टी व पूरपरिस्थिती मुळे अनेक भागात शेती, घरे, जनावरे, जीवित हानी अशा अनेक जीवीत आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. आज राज्याचे माजी मंत्री चंद्रपूर जिल्ह्य़ाचे माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन नुकसानग्रस्त शेती, शेतपिके व अन्य झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांचे सांत्वन करून सर्व नुकसानग्रस्तांना तातडीने सरसकट नुकसान भरपाई देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सुचना केल्या.
यात राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा व गोंडपिपरी तालुक्यामधील पुराने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांच्या वेथा प्रत्यक्ष भेट घेऊन अतीवृष्ठी पाहणी समितीने जाणून घेतल्या. गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव ला पुराने संपूर्ण वेढा घातला होता. येथील कालिदास वाघाडे यांचा १७ वर्षीय मुलगा साहिल हा तापाने फणफणत होता. गावकरी व तालुका प्रशासनाने नावेच्या सहाय्याने त्याला मदत कार्य पोहचवून उपचाराकरिता चंद्रपूर येथे हलविले. मात्र याच दरम्यान त्याला मेंदूज्वर झाल्याने त्याचा करून अंत झाला. ही माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता माजी मंत्री आमदार वडेट्टीवार आणि आमदार सुभाष धोटे यांनी दुर्दैवाने मृत्यू झालेल्या वाघाडे दांपत्याची भेट घेऊन सांत्वन केले. तातडीची आर्थिक मदत ही केली. तर राजुरा तालुक्यातील विरूर् स्टेशन, धानोरा, चिंचोली, कविठपेठ येथे भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे, पुरामुळे क्षेत्रातील गोरगरीब, शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासन व शासन स्तरावर तातडीने कारवाई करून सर्व पुरग्रस्तांना आवश्यक सर्व प्रकारची मदत करण्याची तसेच त्यांना आधार देण्याची गरज असल्याचे मत माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार आणि आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले आहे.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार हरिष गाडे, के. डी. मेश्राम, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला जिल्हाध्यक्षा नम्रता ठेमस्कर, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, चंद्रपूर ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, तुकाराम झाडे, माजी उपनगरध्यक्ष सुनील देशपांडे, ओबीसी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, उपसभापती अशोक रेचनकर, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, तालुकाध्यक्षा कविता उपरे, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, माजी सभापती कुंदा जेनेकर, मुमताज जावेद, निर्मला कुलमेथे, विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मंगेश गुरणुले, देविदास सातपुते, संगीता धोटे, विकास देवाळकर, धनराज चिंचोलकर, इर्शाद शेख यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते.