लोकदर्शन 👉नितेश केराम
कोरपना ग्रामीण रुग्णाल्याच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे सदर काम हे वार्ड दुरुस्तीचे असून दरवाजे नवीन बसविणे वॉर्डातील दोनी बाजूस जुने मजबूत दरवाजे काडून त्या ठिकाणी निकृष्ट दरवाजे ठेकेदाराने लावले आहे. मात्र तिन्ही वार्डाच्या भिंती फोडून अर्धवट काम करून काम बंद आहे त्यामुळे या ठिकाणी रुग्णाचि हाल होत आहे दरवाज्याची रुंदी मोठी आहे व वार्ड ला लागून शौचालय व बा थरूम आहे दरवाजे नसल्याने रुग्णांना शौचालयस जाणे अडचणीचे झाले आहे .नवीन लावण्यात आलेल्या दारे हे वारा आले तरी निघुन जात आहे .मुसळधार पाऊस पडत आहे रात्री दिवसा बाहेर खेड्यातील रन्ग प्र्कृती महिला उपचारासाठी येत आहे सर्डामध्ये कुत्रे मांजरे आहे रात्रीला विषारी किडे साप येतांना या बाबीला जबाबदार कोण ? या दुरुस्तीच्या कामामुळे अधिकारी कर्मचारी त्याच बरोबर रुग्ण परेशान असून या ठिकाणी बेजबाबदार ठेकेदार आपली मनमानी करीत आहे. त्याच बरोबर याबाबिस सार्वजनिक बांधकाम अभियंता कारणीभूत आहे. तरी मुख्य कार्यकारी अधिकारी बांधकाम यांनी या कामाची चौकशी करून निकृष्ट दर्जाचे काम बंद करून ठेकेदार व अभियंतयावर कारवाई करण्याचि मागणी रुन्ग व रुग्णाच्या नातेवाईका कडून करण्यात येत आहे.