लोकदर्शन👉मोहन भारती
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात मागील ३-४ दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. सर्वत्र नदी-नाल्याना पूर आला आहे. राजुरा तालुक्यातील विरूर स्टे. जवळ असलेल्या नाल्यात बस चालकाच्या चुकीने बस पुराच्या पाण्यात अडकली व अडकलेल्या ३५ प्रवाशांना विरूर पोलीस ठाण्यातील पथकाने व नागरिकांच्या धाडसी कामगिरीने सर्वाना सुखरूप बाहेर काढून प्राण वाचविले. पोलिसांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन केलेले हे कार्य कौतुकास्पद, अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया *पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर* यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील पोलिसांनी केलेली ही कामगिरी साहसी असून या पथकातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचे अभिनंदन ही हंसरारजी अहीर यांनी केले आहे.