लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
ब्रिटिश सरकारचा चेव्हणींग ग्लोबल लिडर *ॲड दीपक यादवराव चटक* या सर्वसामान्य घराण्यातील विद्यार्थ्यांने आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा *लखमापूर* या मराठी शाळेमध्ये पूर्ण केलं आणि त्यानंतर पुणे येथे वकीलीचे शिक्षण पूर्ण करून थेट लंडन भरारी घेणारा भारतातील पहिला विद्यार्थी ब्रिटिश सरकारची तब्बल 45 लाख रू ची शिष्यवृत्ती घेणारा बहुमान पटकावणारा लखमापूर चा माजी विद्यार्थी ठरला आहेत
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा *लखमापूर*चे त्यांच्यावर झालेले संस्कार ,जडणघडण व त्याला मदत करणारे शिक्षक, तथा पालक ,सर्व गावाची मान उंचावून मराठी शालेचा विद्यार्थी आपले नाव जगाच्या इतिहासात कोरू शकतो अशी प्रेरणा त्याने मराठी शाळा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली.
*ॲड दीपक चटक व अभियंता सचिन पारखी या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूर येथे करण्यात आला याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष सत्यपाल पिंपळशेंडे शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य जोगी , शाळेच्या मुख्याध्यापिका कु उरकुडे मॅडम, ज्येष्ठ शिक्षक श्री बंडू बुच्चे ,चव्हाण , देशमुख मॅडम,श्री आलम ,श्री करतार सिंग अलावत सर* यांच्या कडून माजी विद्यार्थी म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला.
*ॲड दीपक चटप* यांनी आपल्या *मनोगतातून* त्यांच्यावर झालेले संस्कार आणि माझी जुनी शाळा आणि मला शिकवणारे शिक्षक पुन्हा त्याच गावात त्यांच्याकडून माझा सत्कार होणे हे माझे भाग्य समजतो
समोर बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ते कसे घडले कोणत्या पद्धतीने त्यांनी अभ्यास करून हा भारतातील पहिला बहुमान मिळवला याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून सांगितले, ते म्हणाले की एक दीपक चटप लंडनला गेला या नंतर या मराठी शाळेतील प्रत्येक विद्यार्थी दीपक चटप सारखा देशाचं ,गावाच नाव उंचावेल यासाठी माझ्या कडून ज्या ज्या गोष्टी लागेल त्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन …
सत्कार सोहळ्याचे… *सूत्रसंचालन*
श्री करतारसिंग अलावत यांनी केले तर
*आभार* कु.मोहीनी देशमुख यांनी मानले.
याप्रसंगी विद्यार्थी, पालक,शिक्षक,गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
,