लोकदर्शन👉 राहुल खरात
भुसावळ – मनुष्याच्या जीवनात शालेय जीवनाला खूप महत्त्व असते. शालेय जीवनात त्यांचा पाया मजबूत झाला तर त्यांचे भविष्य उज्ज्वल होत असते. म्हणून शालेय जीवनात जीवन समृद्ध करण्याची ताकद असते, असे प्रतिपादन सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजश्री नेवे यांनी केले.
भुसावळ तालुक्यातील चोरवड येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अॅड. नंदिनी चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून चोरवड सरपंच प्रवीण गुंजाळ उपस्थित होते. प्रास्ताविकात राजश्री नेवे यांनी विद्यार्थ्यांना थोडीफार शैक्षणिक मदत व्हावी या उद्देशाने भुसावळ येथील सखी श्रावणी महिला व उद्देशीय संस्था विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येत असल्याचे नमूद केले. अॅड. नंदिनी चौधरी म्हणाल्या की, गेल्या दोन वर्षापासून कोविडमुळे शाळा कमी अधिक प्रमाणात सुरू झाल्या. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना शाळेची गोडी वाढावी यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम घेणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. उपस्थित विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल, वही, रबर, शॉपनर, कंपास व खाऊ वाटप करण्यात आला. या शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाला मोलाची मदत होणार आहे. सूत्रसंचालन राजेंद्र ठोसरे यांनी तर आभार मंदाकिनी केदारे यांनी मानले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेत वृक्ष लागवड करण्यात आली. ही रोपे जगवण्याचा संकल्प करण्यात आला. त्यासाठी मोठ्या वर्गातील मुलांवर वृक्षसंवर्धनाची जबाबदारी देण्यात आली. यावेळी सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या माया चौधरी, वंदना झांबरे, स्मिता माहुरकर, मंदाकिनी केदारे, निकिता खुशालानी यांच्यासह महिला सदस्य आणि शाळेतील शिक्षक शालिनी चौधरी, राजेंद्र ठोसरे व मनीषा चव्हाण उपस्थित होते.