सेवानिवृत्त शिक्षक बंडुभाऊ धोटे यांना भावपूर्ण निरोप

 

लोलदर्शन 👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर येथील जेष्ठ शिक्षक बंडुभाऊ धोटे प्रदीर्घ सेवेनंतर 30 जून ला सेवानिवृत्त झाल्यामुळे संस्थेच्या वतीने त्याना भावपूर्ण निरोप देण्यात आला,
निरोप व सत्कार समारंभ चा अध्यक्ष स्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक श्री विठ्ठलराव थिपे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,संचालक विकास भोजेकर, व रामचंद्र सोनपितरे,मुख्याध्यापिका तथा प्राचार्या सौ स्मिताताई चिताडे,उपप्राचार्य विजय आकनूरवार,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच बी मस्की,एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा अशोक डोईफोडे होते.
34 वर्षे प्रदीर्घ सेवा केल्या नंतर सेवानिवृत्त झालेले बंडुभाऊ धोटे यांचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन अतिथी च्या शुभ हस्ते गौरविण्यात आले.याप्रसंगी
लता घाटे,वैशाली हेपट, संजय पोगुलवार यांनी बंडुभाऊ धोटे यांच्या कार्याची माहिती दिली, उपस्थित अतिथीनि बंडुभाऊ धोटे यांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्याची प्रशंसा करून पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. बंडुभाऊ धोटे यांनी सत्काराला उत्तर देताना शाळा व संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संचालन पर्यवेक्षक एच बी मस्की यांनी केले तर आभार प्रदर्शन तुकाराम धुर्वे यांनी केले.
कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *