लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे
उरण दि २९
उरण तालुक्यातील प्रसिद्ध शिक्षक, कवी,लेखक,सामाजिक कार्यकर्ते,राष्ट्रपती पदक विजेते मुख्याध्यापक रमाकांत गावंड यांचे ज्येष्ठ सुपुत्र अडव्होकेट सागर रमाकांत गावंड यांनी आता नाट्य क्षेत्रात गरुड भरारी घेतली आहे. नवे लक्ष मालिकेतील त्याच्या कामगिरीवर प्रेषक वर्ग अत्यंत खुश आहे. या नाटकातील कार्याचे सागर गावंड यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आपल्या शालेय जीवनापासूनच उत्तम अभ्यासाबरोबरच नाट्य व कला क्षेत्रात मुंबई पुणे सारख्या शहरी भागांतील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करत अनेक बक्षिसे पटकावली आहेत.ॲड सागर गावंड स्वतः नाट्यलेखन व दिग्दर्शन करत असून त्यांनी रत्नागिरी, पुणे, मुंबई, नाशिक, सातारा, नागपूर, कोल्हापूर येथील महाविद्यालयीन नाट्य व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये राज्य, राष्ट्रीय पातळीवर विजेतेपद पटकावले आहे.महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत वासुदेव बळवंत फडके या नाटकातून चौफेर अभिनय करुन सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सागर गावंड यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.श्रीवाघेशस्वर कलामंच पिरकोन , समर्थ ग्रुप महाराष्ट्र,गावंड परिवारातील सर्व नातेवाईक, समस्त गावंड मित्र परिवार, तमाम पिरकोन ग्रामस्थ, हितचिंतक मित्र परिवार आणि बहुजन समाजातील कलाप्रेमी मान्यवर यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे आणि मनापासून दिलेल्या प्रोत्साहनामुळे ऍडव्होकेट सागर गावंड यांनी राजमाता जिजाऊ,ताराराणी,मन उडू उडू लागल, तेव्हा तू कशी या गाजत असलेल्या सिरीयल मधून आपल्या कसदार अभिनयाची झलक दाखवली आहे.
रसिकांच्या कृपाशीर्वादाने आणि सहकार्यामुळे त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या सिच्युएशनशिप या दोन अंकी कौटुंबिक सामाजिक नाटकाचे महाराष्ट्र भर ११ यशस्वी प्रयोग गाजले आहेत. रविवार दिनांक २६/६/२०२२ रोजी पासून रात्रौ ठिक १० वाजता स्टार प्रवाह चॅनल वर गाजत असलेल्या नवे लक्ष या मालिकेत सागर गावंड झळकले आहेत. हा कार्यक्रम आपण सर्वांनी अवश्य पहावा असे आवाहन सागर गावंड यांचे वडील रमाकांत गावंड यांनी केले आहे.सागरला मिळालेले यश, आशीर्वाद हे माझ्या आगरी समाजाचा बहुमान व उरण वासियांचा अभिमान आहे. असे मत सागर यांचे वडिल रमाकांत गावंड यांनी व्यक्त केले आहे.