वरोरा विद्युत वितरणचे सहायक अभियंता चुक्का एसीबीच्या जाळ्यात

 

*६ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक*

लोलदर्शन👉*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* : सोलर सिस्टम कीट लावण्याकरिता लागणारे डिमांड काढून देण्याच्या कामाकरीता ६ हजार रूपयांची मागणी केल्यानंतर ती लाच घेताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, ३३/११ के.व्ही, उपकेंद्र वरोरा ( बोर्डा) येथील सहायक अभियंता श्रिणु बाबु चुक्का , (वय ४३ वर्षे ) यांना लाचलुतपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूरच्या पथकाने आज रंगेहाथ पकडले. त्यांच्या विरुद्ध वरोरा पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
वरोरा येथील रहिवासी तक्रारदार यांचा सोलर सिस्टम व इलेक्ट्रेशियनचा व्यवसाय आहे. त्यांनी ग्राहकांच्या घरी विद्युत संच ( सोलर सिस्टम ) किट लावण्याचे काम घेतले होते. तक्रारदार हे कीट लावण्याकरिता डिमांड काढण्याच्या कामाकरीता २४ जून २०२४ महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी मर्यादित ३३/११ के वरही उपकेंद्र वरोरा (बोर्डा) कार्यालयात गेले असता सहाय्यक अभियंता श्रिणु बाबू चुका यांनी तक्रारदाराकडे डिमांड काढून देण्याच्या कामाकरीता ६ हजार रुपयांची मागणी करुन स्वत: स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. तक्रारदाराची पैसे देण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यांनी याबाबत चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उप अधिक्षक अविनाश भामरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांनी सापळा रचला आणि आज सोमवारी सहायक अभियंता चुक्का यांना ६ हजार रूपयांची लाच स्वीकारताना महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी मर्यादित ( अर्बन ) कार्यालयातील त्याच्या कक्षात रंगेहाथ पकडले. त्यांना ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात वरोरा पोलीस स्टेशन येथे रात्री ८.०० वाजताच्या सुमारास अपराध क्रमांक ४१३ , भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८, सुधारित अधिनियम २०१८ कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणात अधिक माहिती मिळविण्यासाठी मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालय, वरोरा यांच्या न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याचे कळते.
सदरची कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूरचे पोलीस उपायुक्त/ पोलीस अधीक्षक राकेश, अप्पर पोलीस अधीक्षक मधुकर गिते तसेच पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूरचे अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे, कार्यालयीन स्टॉप निपोकॉ नरेश नन्नावरे, पो.अ. रविकुमार ढेंगळे, राकेश जांभूळकर, वैभव गाडगे, चालक सतीश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली.
यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी/ कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *