लोलदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– आमदार सुभाष धोटे यांच्या पुढाकाराने राजुरा विधानसभा मतदारसंघात राजुरा, कोरपना व गोंडपिपरी तालुक्यातील राजुरा, पेल्लोरा, कळमना, हिरापूर विहीरगाव, रामपूर, कापणगाव, कोठोडा, तांबाडी हेटी, सावलहिरा, मांडवा, इंजापूर, येरगव्हण, हातलोणी, धानोली, गुजरी, तोहोगाव, पाचगाव, राळापेठ, सालेझरी, तारसा, वडोली, वेडगाव, या ठिकाणी गेटेड साठवण बंधा-यांना प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे.
आपल्या मतदार संघाचे विकासासाठी नेहमीच दूरदृष्टी बाळगणारे आ. सुभाष धोटे यांनी राजुरा, कोरपना व गोंडपिपरी तालुक्यात ३२ कोटी ७१ लक्ष १७ हजार रुपये किंमतीचे गेटेड बंधारे मंजूर करण्यात आले आहे. या बंधा-यांच्या माध्यमातुन शेतक-यांना सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आमदार सुभाष धोटे यांनी सातत्याने शासनाकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा केला आहे. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश प्राप्त झाले असून मतदार संघातील शेतक-यांना या माध्यमातुन मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
राजुरा विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात साठवण बंधारे मंजूर झाल्यामुळे राजुरा विधानसभा क्षेत्राचे विकास पुरुष आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नातुन शेतक-यांना सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे.