लोकदर्शन ÷/ वालुर प्रतिनिधी
राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान सन 2022-23 अंतर्गत शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते ,त्यानुसार कृषी विभाग महाराष्ट्र शासना तर्फ ऑनलाईन सोडत काढण्यात आली यामधे 19 लाभार्थ्यांची निवड झाली व लाभार्थी यांना मोबाईल क्रमांकावर वर संदेश पाठवून आपली निवड झाल्याबद्दल कळविण्यात आले , अर्ज करण्यापासून ते निवड होईपर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाइन पार पडल्यामुळे यामधे पारदर्शकता दिसून आली. निवड झालेल्या लाभार्थीना 1200 रुपये अनुदानावर 30 किलो प्रात्याक्षिक बियाणे परमिट देण्यात आले असून, प्रात्यक्षिक सोयाबीन बियाणे बी बी एफ म्हणजेच रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावे असे आव्हान कृषी सहाय्यक संदीप शेळके यांनी केले आले.
कृषी पर्यवेक्षक डी एन फुलारी यांच्या हस्ते परमिट चे वाटप करण्यात आले .बीज प्रक्रिया करूनच बियाणे पेरणी करावे असे अहवांन कृषी पर्यवेक्षक यांनी केले आहे .
यावेळी कृषी सहाय्यक सुनील सोळंके, कृषी मित्र विजय चव्हाण,संतोष लाव्हाले,शेतकरी दत्ता देशमाने,मोरेश्वर चीलवंत,रामकिसन रोकडे,अनिल राख,अर्जुन धापसे,महमद तीमिम अन्सारी, शेतकरी उपस्थित होते.