लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर –
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून गाव , तालुका, जिल्हा, राज्यच नव्हे तर देशाची शान वाढवत तो कोरपण्याचा तरुण अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय आहे.
विजय शिरपुरकर असे त्याचे नाव आहे. ते मूळचे कोरपना तालुक्यातील कोडशी बू चे मुळ रहिवाशी आहे. मागील काही वर्षांपासून त्याचे आई वडील व त्यांचे कुटुंबीय कोरपना येथे वास्तव्यास आले आहे.
त्याची अमेरिकेतील हायड्रोकार्बन प्रोसेसिंग कंपनी मध्ये जजेस ऑफ टेक्निकल बोर्ड म्हणून नुकतीच नियुक्ती झाली आहे. आईल आणि गॅस इंडस्ट्रीज संबंधित नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती या मार्फत उपलब्ध करून दिली जाते. शिरपूरकर हे यापूर्वी सौदी अरेबिया मध्ये एका कंपनीत
तेल आणि वायू क्षेत्रामध्ये संशोधन करून पर्यावरण संवर्धनासाठी मोलाची कामगिरी बजावत होते. तेल आणि वायू विविध घटकावर त्याचे तेथे संशोधन सुरू असायचे. पेट्रोल-डिझेल पॉलिमर असे अनेक घटक वेगळे करण्यासाठी होणार या प्रक्रियेत मोठे इंधन खर्च होते. हे इंधन वाचल्यास पर्यावरणाला मोठा हातभार लागेल. यासाठी त्यांनी संशोधन केले. यासाठी त्यांना यापूर्वीच गौरविण्यात आले होते. त्यांनी अनेक संशोधन प्रबंध सादर केले आहे. आता त्याची अमेरिकेत हायड्रो प्रोसेसिंग कंपनीत जीजस ऑफ टेक्निकल बोर्ड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. शिरपूरकर यांनी आपले दहावीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच पूर्ण केले. पुढे त्यांनी यवतमाळ येथील पॉलिटेक्निक मध्ये केमिकल इंजिनियर मध्ये डिप्लोमा केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रात आपले करिअर करावे. अभिनव संकल्पना सादर कराव्या असे आवाहन प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले