लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर
नोव्हेंबर 2019 मध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. या अतिशय सुंदर आणि भव्य इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले त्याची पाहणी केली. देशातील मंजूर 4 केंद्रांपैकी चंद्रपूर येथे पूर्ण झालेले हे पहिले केंद्र आहे. या ठिकाणी सिकलसेल, हिमोफिलिया व अन्य रक्ताच्या आजाराची तपासणी, उपचार तसेच या आजारांवर नियंत्रण व निर्मूलन यावर देशातील मोठ्या शास्त्रज्ञांमार्फत रिसर्च होणार आहे. मध्य भारतातील विशेषतः चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील तसेच छत्तीसगड , तेलंगणा व अनेक राज्यांना हे केंद्र उपयुक्त ठरेल असे अहीर यांनी सांगितले.