लोकदरशन👉मोहन. भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
या वाढत्या युगात मनुष्याला आपल्या प्रकृतीकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळमिळत नसतो , विशेष करून ट्रक चालकांना या राज्यातुन त्या राज्यात ये – जा करावे लागतात त्यामुळे त्यांच्या राहणीमानात नेहमीच बदल पडत असतो या बाबीकडे लक्ष देत अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर व ग्रामीण रुग्णालय कोरपना आणि नोबेल टि.आय. ट्रकर्स प्रकल्प यांच्या संयुक्त विद्येमानाने ट्रक चालक यांच्या साठी ट्रक यार्ड अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर येथे एच.आय. व्हि. एड्स तपासणी सोबत रक्तदाब तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये एकूण १०० लोकांची तपासणी करण्यात आली.
या तपासणीला सी.एस.आर. प्रमुख सतीश मिश्रा, सचिन गोवारदीपे, संजय ठाकरे, देविदास मांदाळे, लाजीष्टीक विभाग व ग्रामीण रूग्णालय, कोरपना येथील संजय जिवतोडे, दिपाली वाढई तसेच नोबेल टि. आय. ट्रकर्स प्रकल्प, चंद्रपूर येथील अनील उईके, अविनाश सोमनाथे, सन्नी वरखेडे, मयूर जवादे, सागर हेमके यांची उपस्थिती होती.
,,फोटो,,