लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
प्रत्येक क्षेत्रात महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून या स्पर्धेच्या युगात सहभाग घेत आल्या आहेत. या महागाईच्या काळात मुलांना चांगले शिक्षण देण्याकरिता आपल्या घरी येणाऱ्या आमदानीत बढोत्तरी व्हावी म्हणून महिला छोटे- मोठे घरगूती उद्योग सुरू करत असते. याला लक्षात घेत अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर ने एकूण ४० महिलांना शिवणकला प्रशिक्षण देण्याचे ध्येय ठेवत, शिवणकला प्रशिक्षणाचे उद्घाटन अल्ट्राटेकचे युनिट हेड, श्रीराम पी.एस. यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला अल्ट्राटेकचे उपाध्यक्ष, गौतम शर्मा, महाव्यवस्थापक, कर्नल दिपक डे, सी.एस.आर. प्रमुख सतीश मिश्रा, सचिन गोवारदीपे, डॉ. गोदावरी नवलानी, संजय ठाकरे, देविदास मांदाळे व शिवणकला प्रशिक्षक अंजली उपाध्याय आणि सर्व शिवणकला विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
या वेळेस अल्ट्राटेकचे युनिट हेड, श्रीराम पी.एस. व उपाध्यक्ष गौतम शर्मा यांनी सर्व शिवणकलाची माहिती समजुन घेतली व पुढील वाटचालीसाठी सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या.
कर्नल दिपक डे यांनी आम्ही नेहमी महिलांच्या प्रगतीसाठी तत्पर राहु असे सांगितले.
हे शिवणकला प्रशिक्षण दोन गटात २०-२० महिलांसाठी असुन ते ६ महिन्यासाठी सी.एस.आर. आँफीस मध्ये दुपारी१-ते ३ व ३ते-५ या वेळेत असणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना सी.एस.आर. तर्फे सर्टिफिकेट सुद्धा प्रदान करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाला सभोवतालच्या गावातील महिलांचा सहभाग आहे.