लोकदर्शन 👉मोहन भारती
कोरपना – तालुक्यातील लोणी ते पिपरी या ग्रामीण मार्गावरील पिपरी गावाजवळ रस्त्याची एक संपूर्ण बाजूच खचल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित बांधकाम विभागाने दुरुस्ती करावी अशी मागणी पिपरी ग्रामपंचायतचे सदस्य साईनाथ तिखट व ग्रामस्थांनी केली आहे.
लोणी वरून पिपरी गावाकडे जाणारा हा एकमेव पक्का डांबरीकरण झालेला रस्ता आहे. त्यामुळे या परिसरातील संपूर्ण रहदारीच या मार्गावरून होते. मात्र मागील काही दिवसापासून या रस्त्याची संपूर्ण एक बाजूच खचली गेली आहे. त्यामुळे येथून मार्गक्रमण करताना जरा जपूनच जावे लागते आहे. रात्रीच्या वेळेस तर ही अधिकच गंभीर होत असल्याने अनेक किरकोळ अपघातही घडले आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती होणे अत्यावश्यक झाली आहे. तसेच या मार्गावरील झुडपांची कटाई होणे सुरक्षित प्रवासाच्या दृष्टिकोनातून गरजेची आहे. मात्र त्याच्याकडे ही दुर्लक्ष होत आहे. या अनुषंगाने बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती व झुडपाची कटाई करवून घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.