लोकदर्शन 👉 मोहन भारती
♦️विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेच्या प्रयत्नाला यश
सरकार्यवाह – सुधाकर अडबाले
चंद्रपूर °÷ चंद्रपूर येथे 1998 पासून सूरू करण्यात आलेले शाळा न्यायाधिकरण कार्यालय शालेय शीक्षण व क्रिडा विभाग शासन अधिसुचना क्र.एसटीआर./2021 प्र.क्र.139/प्रशा-5 दि.20 मे 2022 नुसार नागपूरला स्थनांतरीत करण्यात आले होते त्यामूळे चंद्रपूर न्यायाधिकारणा अंतर्गत चंद्रपूर,गडचिरोली, वर्धा जिल्हयातील व्यवस्थापक मंडळाकडून सेवामुक्ती,निलंबन, सेवाज्येष्ठताबाबत अन्याय, सेवाज्येष्ठता डावलून दिलेली पदोन्नती अश्या प्रकारच्या अन्यायाच्या विरोधात दाद मागण्यासाठी नागपूरला जावे लागणार होते.आदिवासी नक्षलग्रस्त बहूल चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील अन्यायग्रस्त शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागली असती या शासनाच्या निर्णयाला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे प्रांतीय अध्यक्ष श्रावण बरडे व सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी निवेदनाव्दारे मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांच्याकडे मागणी व पाठपुरावा करून शाळा न्यायाधिकरण चंद्रपूरलाच ठेवावे अशी मागणी केली व लोकप्रतिधींना सुध्दा विनंती करण्यात आली त्याची दखल घेवून मा.आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी शालेय शिक्षण मंत्री चर्चा करून जोरदार पाठपुरावा केला.
त्यामूळे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक आढावा 2021/प्र.क्र.139/21 प्र.षा.-5 दि.02/06/2022 च्या शासन निर्णयानुसार चंद्रपूर येथील शाळा न्यायाधीकरण बंद करण्याचा जो निर्णय घेण्यात आला होता त्यास पूढील आदेश येईपर्यंत शासनाने तात्पूरती स्थगिती दिली आहे.त्यामूळे चंद्रपूर गडचिरोली वर्धा जिल्हयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्याना होणारा त्रास नक्कीच वाचणार आहे.
शासनाने घेतलेल्या निर्णयाचे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेडे कोषाध्यक्ष दिगांबर कुरेकर, उपाध्यक्ष अनिल कंठीवार,सुनिल शेरकी,नामदेव ठेंगणे,मंजुशा धाईत,सहकार्यवाह अनिल कंठीवार,नितीन जिवतोडे, शालीक ढोरे,सोनाली दांडेकर,मा.व.प्रतिनीधी दिपक धोपटे, अल्पसंख्याक प्रतिनीधी अतिक कुरेशी महिला प्रतिनीधी वसुधा रायपुरे, सल्लागार मारेातराव अतकरे,प्रमोद कोंडलकर,देवराव निब्रड,श्रीराम भोयर,यांनी शासनाचे अभिनंदन केले आहे.
( *खाजगी माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याना* **संस्थेकडून* *बेकायदेशिर व नियमबाहय* *सेवामुक्त,बडतर्फ,पदावन्नत,* *सेवाज्येष्ठता डावलून अश्या* *_प्रकारच्या अन्यायाविरूध्द* *शाळा_ न्यायाधिकरणाकडे दाद* *मागण्याची तरतूद महाराष्ट्र* *खाजगी शाळा* *कर्मचारी* ( *सेवेच्या शर्ती)*****अधिनियम 1977* व*** *नियमावली 1981 मध्ये दिलेली* *आहे.*
*शाळा *न्यायाधिकरण* *चंद्रपूरहून* *हि नागपूरला** *स्थलांतरीत करण्याचा निर्णयास* *दिलेल्या स्थगीतीचे* *विदर्भ माध्यमिक* *शिक्षक संघटनेव्दारे* *अभिनंदन* *करण्यात येत आहे.)- सुधाकर* *अडबाले**