*लोकदर्शन 👉महेश गिरी
दिं.२८/०५/२०२२ ल विभागीय आयुक्त कार्यालय नागपुर येथे *भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र नागपूर विभाग* च्या वतीने समर्पित आयोगाला निवेदन देऊन ओबीसींच्या व भटके विमुक्ततांचा प्रश्नांवर चर्चा केली. व त्वरित ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळवुन देण्यासाठी न्यायालयात टिकू शकेल असी सांख्यिकीय माहिती गोळा करून ओबीसीचे व भटके विमुक्त जाती चे मागासलेपण सिद्ध करावे. तसेच होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये ओबीसींच्या जातनिहाय जनगणने प्रमाणे भटके विमुक्त जाती ची सुद्धा वेगळी जनगणना करावी व ओबीसीमधील आमचा 11% चा आम्हाला राजकीय व शेक्षणिक अधिकार देण्यात यावे अशाप्रकारचे निवेदन समर्पित आयोगाला देण्यात आले. प्रसंगी भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र नागपूर विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.
*महेश गिरी (विदर्भ अध्यक्ष), दयालनाथ नानवटकर( नागपूर जिल्हा अध्यक्ष), विजय आगरकर (जिल्हा सचिव नागपूर), नितेश पुरी ( जिल्हा अध्यक्ष भंडारा), गोवर्धन बडगे (उपाध्यक्ष नागपूर), प्रविण पाचंगे ( उपाध्यक्ष नागपूर), प्रदीप पुरी ( कार्याध्यक्ष नागपूर), यशवंत कात्रे ( मुख्य संघटक नागपूर), अंकित पवार ( सहसचिव नागपूर), अमोल राठोड ( संघटक नागपूर), अविनाश पंचबुधे , भिसे , इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.