लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा साजरी करायची आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोना च्या महामारी मूळे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नाही, यावर्षी मात्र राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती दिनांक 31 मे 2022 रोजी मंगळवार ला साजरी करण्यात येणार आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहास हा संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. अहिल्यादेवी चे संपूर्ण चारित्र्य प्रेरणादायी आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, विकास कारण आधी मध्ये त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे,त्यांनी अनेक जनकल्याणकारी कार्य केले आहे.मंदिर, घाट, रस्ते,धर्मशाळा तर संपूर्ण देशभर बांधल्या. अनेक अंधश्रद्धा असलेल्या परंपराना प्रतिबंध घातला.प्राणिमात्रांची व निसर्गाची विशेष काळजी घेतली. या त्यांनी केलेल्या कार्याची जनजागृती होण्याकरता दि.31 मे 2022 रोजी मगळवरला महाराष्ट्र राज्यातील सर्व समाज बंधू , भगिनींनी, तरुण मुले, मुली यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराघरांत वस्त्यांवर,गावागावात,तालुका स्तरावर, मोठ्या शहरात मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी करण्याचे आव्हान यशवंत कातरे नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी केले.