लोकदर्शन 👉 राहूल खरात
घरोघरी शाळा उपक्रमाचे प्रणेते व वडगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय खरात यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या विविध उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल कडून राज्यस्तरीय आदर्श सेवासन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
पुणे येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमामध्ये सिनेअभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड व शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या शुभहस्ते तसेच शिक्षक आमदार सुधीर तांबे व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शाल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन त्यांना सन्माननीत करण्यात आले.
या पुरस्कारासाठी महाराष्ट्र शिक्षक पॅनलची टीम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या व शिक्षण क्षेत्रात अलौकिक कामगिरी करणाऱ्या आदर्श शिक्षकांचा शोध घेऊन तीन वर्षातून एकदा सदर पुरस्कार सोहळ्याचे स्वखर्चाने आयोजन करत असते.
सातारा जिल्ह्यातून यावर्षीच्या पुरस्कारासाठी महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे सातारा प्रतिनिधी श्री. संदीप गुळवे व राज्याच्या टीमकडून श्री.संजय खरात यांनी कोरोना कालावधीत ‘घरोघरी शाळा’ या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यभर केलेल्या शैक्षणिक कार्याची दखल घेतली व एकमताने त्यांची निवड करुन त्यांना सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.