————————————
लोकदर्शन उस्मानाबाद(प्रतिनिधी)👉 राहुल खरात दि.१६ एप्रिल
जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारूणी तथागत गौतम बुद्ध यांची २५६६ वी जयंती उस्मानाबाद शहर व परिसरात मोठ्या उत्साहाने सार्वञिक ठिकानी व घराघरातून साजरी करण्यात आली.आज संपूर्ण जगाला बुध्दाच्या विचाराची गरज भासू लागली आहे.कारण “युध्द नको बुध्द हवा!” ही परिस्थिती आज सर्वञ आहे. बुध्द धम्मामध्ये वैशाख बुध्द पौर्णिमेला खुपच महत्व आहे कारण बुध्दाचा जन्म,त्यांना प्राप्त झालेली ज्ञानप्राप्ती आणि त्यांचे झालेले महापरिर्निर्वाण वैशाख पौर्णिमेलाच हा ञिवेणी संगम आहे.वैशाख पौर्णिमा म्हणजे बौध्द बांधवासाठी वर्षातला हा मोठा सणच असतो. उस्मानाबाद शहरातील शाहूनगर—जेतवन काॅलनी येथील “गाव तिथे बुद्ध विहार “या कादंबरीचे लेखक प्राध्यापक राजा जगताप यांनीही आपल्या घरी वैशाख बुद्ध पौर्णिमा साजरी केली. गेली दोन वर्षे कोरोणाचे निर्बंध असल्याने मर्यादित स्वरूपात वैशाख बुद्ध पौर्णिमा साजरी झाली होती. यावर्षी कोरोनाचे निर्बंध नसल्याने वैशाख पौर्णिमा सर्वञ विविध उपक्रमांनी साजरी झाली