उत्तर नागपूर क्षेत्रात २३० विविध ठिकाणी पारेषण संलग्न सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित करणा

By : Shankar Tadas

लोकदर्शन👉

*उत्तर नागपूर येथे विविध चार ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पाचे ऊर्जामंत्री यांच्या हस्ते उद्घाटन*

नागपूर दिनांक ४ मे :
जन सामन्यांना अपारंपारिक ऊर्जा स्रोतांच्या वापरा करीता प्रोत्साहित करण्याचे दृष्टीने उत्तर नागपूर क्षेत्रात २३० विविध ठिकाणी पारेषण संलग्न सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित करण्यात येत आहेत. आज राज्याचे ऊर्जामंत्री मा. ना. डॉ नितीन राउत यांच्या हस्ते विविध चार ठिकाणी सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन पार पडले.

राज्यातील वाढते औद्योगिकरण व शहरीकरणामुळे पारंपारिक विजेची मागणी दिवसेंदिवस वृद्धींगत होत आहे. या वीजेची निर्मिती करताना हवेच्या प्रदुषणात मोठी भर पडत आहे. यामुळे वैश्विक तापमान वाढ आणि पर्यावरण बदलाचा अनिष्ट परिणाम सर्वाना सोसावा लागत आहे. या समस्येवर उपाय म्हणुन अपारंपारिक ऊर्जा स्रोतातुन वीज निर्मितीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध असून प्रयत्नशील आहे.

पर्यावरण संवर्धन व विज देयकात बचत होण्याच्या कार्यात या प्रकल्पांमुळे हातभार लागेल व जनजागृती होईल, असा विश्वास यावेळी माननीय ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी व्यक्त केला.
मा. उर्जामंत्री डॉ. नितिन राऊत यांच्या पुढाकाराने मा. श्री. रविंद्र जगताप (भा.प्र.से.) (महासंचालक, महाऊर्जा) मा. श्री. सुरज वाघमारे (अपर महासंचालक, महाऊर्जा) विनीत श्री. वैभव पाथोडे (प्रादेशिक संचालक, महाऊर्जा, नागपूर) यांच्या मार्गदर्शनात सदर प्रकल्प राबविण्यात येत आहे.
बडी मशीद, बंदे नवाज चौक, नागपूर येथे ५ कि.वॅ. क्षमतेचे पारेषण संलग्न सौर ऊर्जा प्रकल्पाची आस्थापना करण्यात आली. सदर प्रकल्पाची अंदाजित किंमत रु.२.४५ लक्ष इतकी असून या प्रकल्पातून ६००० यूनिट ची वीज निर्मिती प्रति वर्ष होणे अपेक्षित आहे.
अबू बकर मदरसा, नवीन वस्ती, टेका, नागपूर येथे ४ कि. वॅ. क्षमतेचे पारेषण संलग्न सौर ऊर्जा प्रकल्पाची आस्थापना करण्यात आली.
सदर प्रकल्पाची अंदाजित किंमत रु. १.९५ लक्ष इतकी असून या प्रकल्पातून ४८०० यूनिट ची वीज निर्मिती प्रति वर्ष होणे अपेक्षित आहे.

नूर मशीद, अशोक नगर, नागपूर येथे ३ कि. वॅ. क्षमतेचे पारेषण संलग्न सौर ऊर्जा प्रकल्पाची आस्थापना करण्यात आली.
सदर प्रकल्पाची अंदाजित किंमत रु.१.४६ लक्ष इतकी असून
या प्रकल्पातून ३६०० यूनिट ची वीज निर्मिती प्रति वर्ष होणे अपेक्षित आहे. यातून पर्यावरण संवर्धन साधले जाईल.
माता वेलांकनी ग्राटो चर्च, सेंट मार्टिन नगर, जरीपटका, नागपूर येथे २ कि. वॅ. क्षमतेचे पारेषण संलग्न सौर ऊर्जा प्रकल्पाची आस्थपना करण्यात आलेली आहे.
सदर प्रकल्पाची अंदाजित किंमत रु.१.०२ लक्ष इतकी असून या प्रकल्पातून २४०० यूनिट ची वीज निर्मिती प्रति वर्ष होणे अपेक्षित आहे.
यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *