——————————————
लोकदर्शन उस्मानाबाद (प्रतिनिधी)👉राहुल खरात।
दि.१मे
येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिनामित्त मा. प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,श्रीमती सुशिलादेवी साळुंखे अध्यापक विद्यालय, डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय, डीएड अध्यापक विद्यालय या चार शाखांचा एकञित संयुक्त कार्यक्रम डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय मध्ये संपन्न झाला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य व श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख डाॅ. जयसिंगराव देशमुख होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. व्हि.जे.शिंदे यांनी केले यावेळी माजी प्राचार्य बी. एस चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. सदर समारंभामध्ये रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील अकरावी आर्टस, कॉमर्स व सायन्स या वर्गाचा महाराष्ट्र दिनी निकाल जाहीर करण्यात आला. विज्ञान विभागात श्री. जंगम ओम सिध्देश्वर ९४% प्रथम क्रमांक, कुमारी धिमधिमे मानसी राजेंद्र ८८.८३% द्वितीय , कुमारी शिंदे स्नेहा संतोष ८८%तृतीय, वाणिज्य शाखेमध्ये कुमारी मगर वैष्णवी दत्तात्रेय ८०.६६% प्रथम, कुमारी देशमुख साक्षी प्रशांत ७९.८३%% द्वितीय, कुमारी बोबडे ज्योती मारुती ७९.३३% तृतीय क्रमांक, कला शाखेमध्ये श्री अमृतराव अर्जुन दत्तात्रेय ७५.५०% प्रथम क्रमांक, कुमारी ढोले प्रतीक्षा विश्वनाथ ७१.५०% द्वितीय, कुमारी घार्गे प्रजाक्ता प्रकाश ७१.३३% तृतीय,एम.सी.व्ही.सी. विभागात श्री. इंगळे विजय कुमार मकरंद ७६.१६% प्रथम ,श्री वडजे दीपक बाळासाह७३.८३%द्वितीय,श्री.गाजरे शिवप्रसाद शंकर ७२%तृतीय या गुणवंत विद्यार्थ्यांच्या बरोबरच गांधी विचार संस्कार परीक्षा(२१-२२)मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातून ११वी विज्ञानची कुमारी नंदिनी काकासाहेब प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक श्री.इंगळे आदित्य विजय १२वी वाणिज्य यांचा सत्कार प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख,प्राचार्या डाँ.सुलभा देशमुख,माजी प्राचार्य डाॅ.बी.एस.चौधरी,प्र.प्राचार्य डाॅ.व्ही.जे.शिंदे,प्र.प्राचार्य आर.आर.पवार,यशवंतराव चव्हाण म.मुक्त विद्यापीठाचे केंद्रप्रमुख प्रा.डी.एम.शिंदे या मान्यवरांचे हस्ते संपन्न झाला.प्रास्ताविक प्र.प्राचार्य डाॅ.व्हि.जे.शिंदे यांनी केले .
यावेळी अध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की,देशाच्या आर्थिक विकासात कामगारांच्या श्रमाला महत्व आहे.त्यांच्या श्रमामुळेच उद्योग व व्यापाराला चालना मिळते सामान्य कामगाराच्या घामावरच आज राज्याची प्रगती होत आहे.माहिती व तंत्रज्ञानात आणि यांञिकीकरणात आज आपण प्रगती केली आसली तरी कामगाराच्या श्रमाला विसरता येणार नाही.यावेळी ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार संपन्न झाले त्यांनी भविष्यात अधिक अभ्यास करून आपली प्रगती करून महाविद्यालयाचे नाव कमवावे.
यावेळी विस्तारअधिकारी जंगम,व पालक आणि चारही शाखेतील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
सूञसंचलन प्रा.डाॅ.संजय आंबेकर यांनी केले आभार प्रा.चांदणी घोगरे यांनी मानले.