लोकदर्शन 👉 मोहन भारती
जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे ध्वजारोहण कार्यक्रम श्री जयपाल राऊत सर मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जयपाल राऊत सर मुख्याध्यापक उद्घाटक श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हेते तर प्रमुख पाहुणे श्री चौधरी सर, सौ शारदा ताई मेश्राम, श्री डोहे सर,जिवतोडे सर, श्री तेलंग सर,सौ मडावी मॅडम,श्री किशोर जेनेकर,सौ मंजुशा भोयर,सौ संगीता चौधरी,सौ सविता वाघाडे,भगत मैडम आदी मान्यवर उपस्थित होते श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगतात एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो महाराष्ट्र राज्याची निर्मीती 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो महाराष्ट्र राज्य साठी बलिदान झालेल्या 106 हुतात्म्यांना स्मरण केले जाते एक मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो म्हणून ह्या दिवशी ध्वजारोहण करून आनंद उत्साहाने साजरा केला जातो तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन श्री जिवतोडे सर यांनी केले तर आभार श्री डोहे सर यांनी मानले कार्यक्रमाला गावातील नागरिक महिला पुरुष, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य मनवर,सौ ताराबाई मेश्राम,सौ संध्या गेडाम यांनी केले