लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात चंद्रपूर महानगरात अमृत पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करताना मला मनापासून आनंद होत आहे. या अमृत नळ पाणी पुरवठा योजनेला राज्य व केंद्राची मान्यता मिळविणा-या सर्वांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. १९९५ मध्ये जेव्हा मी या विधानसभा क्षेत्राचा आमदार म्हणून निवडून आलो त्याकाळी या शहरात प्रचंड पाणी टंचाई होती. त्यानंतर वाढीव पाणी पुरवठा योजना आमही मंजूर करविली. आज अमृत नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातुन या शहरातील पाणी टंचाईवर उपाययोजना झाल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पुढील काळातही भारतीय जनता पार्टी या शहराच्या विकासासाठी वचनबध्द असल्याचे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. सदर अमृत पाणी पुरवठा योजना जगन्नाथ बाबा नगर, रेवेन्यू कॉलनी, विदर्भ हाउसिंग कॉलनी, जीवन साफल्य कॉलनी, अभियंता कॉलनी आदी भागांमध्ये पाणीपुरवठा करणार आहे.
दिनांक २८ एप्रिल २०२२ रोजी चंद्रपूर शहरातील नगीनाबाग प्रभाग क्र. ९ मध्ये अमृत नळ पाणीपुरवठा योजनेचे झोन क्रमांक १४ चे लोकार्पण संपन्न झाले. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. सोबतच विविध विकासकामांचे भूमीपूजन देखील यावेळी संपन्न झाले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी महापौर सौ. राखी कंचर्लावार, माजी उपमहापौर राहूल पावडे, भाजपा नेते प्रमोद कडू, सौ. सविता कांबळे, अरूण तिखे, प्रशांत चौधरी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, चंद्रपूर शहरात विकासात दिर्घ मालिका आम्ही माझ्या अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात तयार करू शकलो याचा मला मनापासून आनंद आहे. चंद्रपुरातील प्रियदर्शिनी नाटयगृहाचे अत्याधुनिकीकरण, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे बांधकाम, टाटा ट्रस्टच्या सहकार्याने कॅन्सर हॉस्पीटलचे बांधकाम, सैनिकी शाळा, बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र, बाबुपेठ प्रभागात शांतीधाम विकसित करणे, दाताळा परिसरात केबल स्टेड पुलाचे बांधकाम, पत्रकार भवन, बाबुराव शेडमाके स्टेडियमच्या बांधकामासाठी निधी मंजूर, ज्युबिली हायस्कुलच्या नुतनीकरणासाठी निधी मंजूर, श्री महाकाली मंदिर परिसराच्या विकासासाठी ६० कोटी रू. निधी मंजूर, जिल्हा स्टेडियमचा पुर्नविकास, छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सौंदर्यीकरण, बाबा आमटे अभ्यासिका, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम निसर्ग उद्यान, बाबुपेठ परिसरातील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमचे बांधकाम, देशातील अत्याधुनिक वनअकादमी, पोलिस वसाहतीचे बांधकाम, पोलिसांसाठी जीमचे बांधकाम, नियोजन भवनाचे बांधकाम, कोषागार कार्यालयाचे बांधकाम, चंद्रपूर शहरातील मोकळया जागांचा विकास करत त्याठिकाणी बालोद्यानाची निर्मीती, अमृत पाणी पुरवठा योजना, शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयातील मुलींच्या वसतीगृहासाठी ७ कोटी ८९ लक्ष ६० हजार रू. अशी विकासाची दिर्घमालिका आम्ही या शहरात उभी केली आहे. केंद्रीय सांस्कृतीक कार्यमंत्री किशन रेड्डी यांची भेट घेवून श्री अंचलेश्वर मंदीराचा विकास प्रसाद योजनेच्या माध्यमातुन करण्यासाठी आमही प्रयत्नशील आहोत. भारतीय जनता पार्टीने या शहराच्या विकासासाठी आजवर परिश्रम घेतले. कोव्हीड काळातील संकटादरम्यानही मदतीसाठी भारतीय जनता पार्टी तत्पर होती. आम्ही आजवर विकासाचे राजकारण केले व त्या माध्यमातुन समाजाची सेवा केली व भविष्यातही करू असे प्रतिपादन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपमहापौर राहूल पावडे यांनी केले. प्रास्ताविकात बोलाताना चंद्रपूर शहरातील विकासाची गंगा आणल्याबद्दल राहूल पावडे यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला सुरेश हरीरमाणी, अनिल बुधवार संजय निखारे चांद सय्यद रवी जोगी सुनील डोंगरे प्रमोद क्षिरसागर, सत्यम गाणार, आदित्य डवरे, अक्षय शेंडे, संदीप सदभैये, सुशांत अक्केवार, आशीष वरारकर, महेश राउत, सचिन बोबड़े शैलेश पिपरे, सुशांत शर्मा, शिवांश शर्मा, सचिन लग्गड, रितेश वर्मा, पंकज भड़के, पीयूष लाकड़े आदींसह नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.