लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात
यापूर्वी भारत सरकारतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय फिल्म फेअर पुरस्कार आपल्या बार्डोला मिळाला होता . हा पुरस्कार आपण दिल्ली येथे उपराष्ट्रपती यांच्याहस्ते स्विकारला होता .
आता पुन्हा या चित्रपटाला चार नामांकने मिळाली आहेत . या चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक म्हणून आपले योगदान महत्वपूर्ण असेच आहे .
सध्या सोनी मराठीवर ” मुलगी काय करते ” . ही आपली मालिका सुद्धा खुप गाजतेय .
माणदेशातील आटपाडी नजिकचे मुढेवाडी हे आपले छोटेसे गाव . काही महिन्यांपूर्वी या गावातच आपली भेट झाली . चित्रपटांसहीत विविध विषयांवर आपली चर्चा रंगली . दिल्ली दरबारापर्यंत मराठी चित्रपटाचा झेंडा आपण फडकविलात .
सर्वसामान्यांपर्यंत मिळून मिसळून वागण्याचा आपला प्रेमळ स्वभाव, माणदेशी माती बद्दल आपलं जिवापाड प्रेम , आपल्या क्षेत्रात जिव ओतून कौशल्यपूर्ण काम करण्याची आपली हातोटी यासर्वांमुळे आपल्याला आपल्या चित्रपट तसेच दूरदर्शन मालिकां क्षेत्रांत चांगले यश मिळत आहे . हे आम्हा सर्व माणदेशवासियांच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे .
राज्य मराठी चित्रपट महोत्सवात आपल्या बार्डो चित्रपटाला ०४ नामांकने मिळाली . त्याबद्दल तुमचे व तुमच्या सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन . भावी वाटचालीस खुप साऱ्या शुभेच्छा .
सुनील दबडे
( जेष्ठ साहित्यिक )