लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕कळमना येथे १ मे ला चंदू पाटील मारकवार यांच्या हस्ते उद्घाटन.
राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथील दानशूर व्यक्तीमत्व समाजसेवक स्वर्गीय नागोबा पाटील वाढई यांच्या पुतळ्याचे व स्मारकाचे अनावरण दिनांक १ मे रोज रविवार ला दुपारी १२ वाजता मौजा कळमना येथे नवीन हनुमान मंदिराच्या समोरील पटांगणावर करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचा आदर्श गाव पुरस्कार प्राप्त राजगड चे सरपंच चंदू पाटील मारकवार, सहउद्घाटक शिवराम पाटील पाहनपट्टे, कार्यक्रमाचे अध्यक्ष कळमनाचे सरपंच अखिल भारतीय सरपंच परिषदचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई, प्रमुख अतिथी म्हणून ग्रामगीताचार्य मारुती सातपुते, वडगाव चे माजी सरपंच तथा जेष्ठ नागरिक आनंदराव पाटील परसुटकर, उपसरपंच कौशल्या कावळे, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तमुस अध्यक्ष महादेव ताजणे, ग्रा प सदस्य दीपक झाडे, साईनाथ पिंपळशेळे, रंजना पिंगे, सुनिता उमाटे, प्रियंका गेडाम, भाऊजी पाटील वाढई, जेष्ठ नागरिक पुरुषोत्तम पाटील काळे, नानाजी पाटील सपाट, महादेव पाटील विश्राम, महादेव पाटील पिंगे, विठोबा पाटील ताजने, नानाजी पाटील सुमटकर, माजी सरपंच सुधाकर पिंपळशेंडे, पोलीस पाटील गोपाल पाल इत्यादी उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, भजन मंडळाचा सत्कार, माजी सरपंच व पोलीस पाटील यांचा सत्कार, समाजसेवक व्यक्तींचा सत्कार, गरीबीतून शिक्षण पूर्ण करून यशस्वी होणाऱ्या युवकांचा सत्कार स्व. नागोबा पाटील वाढई यांच्या कुटुंबियांकडून करण्यात येणार आहे. परिसरातील नागरिकांनी मोठय़ा संख्येने या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.