लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕निमणी गावचा होणार कायापालट
५ वर्षात समृद्ध गावं होणार
गडचांदूर: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत दस वार्षीक सूक्ष्म आराखड्यासाठी कोरपना तालुक्यातील निमणी ग्रामपंचायतची निवड करण्यात आली चार दिवसीय निवासी शिबीरात सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंकज साखरकर यांनी २६ कोटी रुपयांचा आराखडा तयार करून निमणी ग्रामपंचायत सरपंच सीमा जगताप यांच्याकडे सुपूर्त केला.
यावेळी उपसरपंच उमेश राजूरकर ग्रामसेवक एस डी ढवळे सहायक कार्यक्रम अधिकारी पंकज साखरकर प्रशांत भोयर अजय गजपुरे शुद्धोधन जगताप रोजगार सेवक आतिष पिदूरकर ऑपरेटर प्रफुल मोरे आदी उपस्थित होते
कार्यक्रम अधिकारी पंकज साखरकर यांनी सांगितले की दहा वर्षासाठी एकूण २६ कोटी रुपयांचा कुशल व अकुशल असा सूक्ष्म आराखडा तयार केला आहे जेणेकरुन भविष्यात निमणी गावाचा विकास साधता येणार आहे शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ मिळेल व मजुरांना काम मिळणार आहे.
उपसरपंच उमेश राजूरकर यांनी सांगितले की निमणी गावासाठी भरीव निधीचा सूक्ष्म आराखडा तयार करण्यात आला असून ५ वर्षात निमणी गावं समृद्ध गावं झाल्याशिवाय राहणार नाही
कार्यक्रमाचे संचालन प्रशांत भोयर तर आभार एस डी ढवळे यांनी मानले यावेळी गावकरी उपस्थित होते