लोकदर्शन👉
By : Gulab Lande
वर्तमानात भारतातीलच नाही तर जगातील लोकशाही धोक्यात असल्याचे चित्र दिसत आहे. लोकशाही ची स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्य दुरापास्त होत चाललेली आहे. मोठ्या देशांनी लहान देशांना गिळंकृत करावे. इतर देशांनी बघ्यांची भूमिका घ्यावी. नाही त्यांना तसे करावेच लागेल कारण सगळे एकाच माळेतील मणी. आपल्या देशाचे संरक्षण करणे ही आपल्या सरकारची जबाबदारी आहे. लोकशाही मार्गने देश चालविण्यासाठी मतदारांनी लोकप्रतनिधी निवडून दिले. त्यांनी सरकार स्थापन करून देशाची अंतर्गत व बाह्य सुरक्षा सांभाळून, लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि चांगले शिक्षण देवून देशाचा सर्वांगीण (आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, राजकीय व इतर) विकास करणे गरजेचे आहे. विकास ही निरंतन व दीर्घकालीन प्रक्रिया आहे. यातील मुख्य अडथळा म्हणजे भ्रष्टाचार. तो रोखणे ही सरकारची तशीच लोकांची जबाबदारी आहे. पण चोरांच्या हाती तिजोरीची चाबी अशी आपली गत आहे. मतदारांनी भ्रष्टाचार व महागाईला कंटाळून, अच्छे दिन च्या आशेने नवीन सरकार निवडून दिले. २०१४ च्या निवडणुकीत राममंदिर, गर्व से कहो, असे मुद्दे नव्हते. काही थोड्या फार फरकाने काह ठिकाणी असेलही पण मुख्य मुद्दा नव्हता. २०१९ च्या निवडणुकीत पूर्ण बहुमतात एकाच पक्षाला निवडून दिले.(ईव्हीएम ची कमाल अशी बऱ्याच मतदारांची समजूत) सरकारचे सर्व निर्णय चुकले अशी विरोधी पक्षाची बोंब. पण कलम 370 हटविणे, तीन तलाक कायदा रद्द असे काही निर्णय लोकांच्या पसंतीला उतरले आहेत.
भारतातील लोकशाही ला धोक्यात आणण्याचे काम राजकीय नेते करीत आहेत. एकदा सत्ता मिळाली की, ती कधीही दुसऱ्या पक्षाच्या किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या हातात जावू नये असे वाटणे व ती टिकविण्यासाठी कोणत्याही स्थराला जाणे हे आत्ताच्या भारतातील राजकीय नेते व लोकप्रतनिधी यांच्या बोलण्यावरून, कृतीवरून दिसून येते. मी अक्कल शून्य म्हणणार नाही कारण हे लोक जाणीवपूर्वक व सद्सदविवेक बुद्धी शाबूत ठेवून वागत आहेत. आपल्या मतदारांना निर्बुद्ध समजून. आपल्याला कशासाठी निवडूण दिले आपण काय करतो याचे भान त्यांना नक्कीच आहे. निवडणुका आल्या की, आपण कोणती लोकहिताची कामे केली आहे हे न सांगता लोकामध्ये जाती, धर्माच्या, देवांच्या नावाने फुट पाडून आपण राजकीय लाभ उठविण्याचे काम काही राजकीय पक्ष करीत आहेत. कोणत्याही पक्षाला किंवा व्यक्ती ला बांधील न राहता. जो पक्ष किंवा उमेदवार योग्य वाटेल त्यालाच मतदान करावे. आपल्या पक्षाचे किंवा संघटनेचे किंवा गटाचे ऐवढे मतदार आहेत हे दाखविण्यासाठी मतदान करू नये. एक चांगला प्रतिनिधी निवडण्यासाठी त्याला मदत होईल यासाठी मतदान करा. नवीन पक्षाच्या उमेदवारांना जे आजपर्यंत कोणत्याही पक्षाला बांधले गेलेले नव्हते अशाच उमेदवाराला निवडून द्यावे. एकदा प्रतिनिधी निवडूण दिला म्हणजे आपले काम झाले असे नाही. आपण निवडून दिलेला प्रतिनिधी चांगले काम करीत नसेल तर त्याला त्याची जाणीव करून देणे हे आपल्या सुज्ञ नागरिकाचे कर्तव्य आहे. आपल्या देशातील मतदार हा सुज्ञ आहेतच जेव्हा जेव्हा लोकशाही, आपला देश धोक्यात आहे असे वाटले, तेव्हा तेव्हा मतदारांनी योग्य निर्णय घेतलेला आहे. आज देशपातळीवर व जागतीक पातळीवर लोकशाही, आपले स्वातंत्र्य धोक्यात येईल अशा घटनांनी वेग धरला आहे. लोकशाही, आपले स्वातंत्र्य गिळंकृत करण्याचे काम राजकीय लो करीत आहेत. आता लोकशाही वाचविणे मतदारांच्या हातात आहे. मतदान करून निवडून दिलेले प्रतिनिधी चांगले काम करीत नसेल तर मतदारांनी, जनतेनी योग्य निर्णय घेण्याची व सरकारला तो निर्णय अंमलात आणण्यासाठी भाग पाडणे. हे जर शक्य होत नसेल तर “माझा देश, माझा निर्णय” असा निर्णय जनतेला घ्यावा लागेल. राजकीय लोकांनी विक्रीस काढलेल्या लोकशाहीला फक्त आणि फक्त मतदारच वाचवू शकतो.
जी.एम. लांडे
लेखक (एक मतदार)
मो. नं. ९९२३१११०६१