लोकदर्शन 👉 मोहन भारती
*⭕निमणी येथे दस वार्षिक सुक्ष्म नियोजन आराखडा कार्यक्रम*
कोरपना तालुक्यातून निमणी गावाची निवड
गडचांदूर :- प्रत्येक गावातील गावकऱ्यांनी आपसातील मतभेद दूर सारून गावाच्या विकासासाठी एकत्र यावे असे प्रतिपादन निमणी ग्रामपंचायतचे उपसरपंच उमेश राजूरकर यांनी केले ते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत निमणी येथे दस वार्षिक सुक्ष्म आराखडा कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष निमणी ग्रामपंचायतचे उपसरपंच उमेश राजूरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंकज साखरकर प्रशांत भोयर अजय गजपुरे आर ओ एस एन भरडकर वनरक्षक अधिकारी बी सी ब्रम्हटेके पी एन तांबूळगे ग्रामसेवक एस डी ढवळे कृषी सहायक धनंजय भगत तालुका सहाय्यक नरेगा एस एस गेडाम मुख्याध्यापक बी एन कोंगरे ग्रामपंचायत सदस्या गिरजाबाई गोबाडे सुनंदा टोंगे आदी उपस्थित होते.
पुढे राजूरकर म्हणाले की निमणी गावाची पाणलोट क्षेत्र व मनरेगा दस वार्षिक सुक्ष्म आराखड्यासाठी तालुक्यातून निवड झाली आहे याचा फायदा गावकर्यांनी करून घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले
कार्यक्रम अधिकारी पंकज साखरकर यांनी सांगितले की आम्ही चार दिवस मुक्कामी राहून निमणी गावाचा आराखडा तयार करणार आहो यामध्ये सर्वांचे जॉब कार्ड तयार करणे कुटुंब सर्व्हेक्षण गावं फेरी शिवार फेरी मनरेगा २६२ कामांपैकी वयक्तिक व सार्वजनिक लाभ देणार आहो
प्रशांत भोयर यांनी सांगितले की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा उद्देश शेतकरी लखपती बनविणे व गाव समृद्ध करणे असा असून याचा फायदा प्रत्येक कुटुंबांनी घ्यावा
कार्यक्रमाचे संचालन एस गेडाम तर आभार एस ढवळे यांनी मानले यावेळी तालुक्यातील रोजगार सेवक गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते