*लोकदर्शन उरण 👉 (विठ्ठल ममताबादे) .*
⭕फास आवळला,आत्ता सुटका नाही.
दि 23 एप्रिल 2022मुख्य तक्रारदार प्रमोद ठाकूर यांनी तक्रार करून 3 महिने उलटून देखील तसेच उपोषणकरर्ते ॲड. निशांत घरत यांनी 15 दिवस आमरण उपोषण करूनदेखील JNPT प्रशासनाने श्रीमती मनीषा जाधव यांच्या विरोधात कोणतीही कारवाई न केल्यामुळे प्रमोद ठाकूर, निशांत घरत, काशिनाथ गायकवाड, मनीष कातकरी यांची दिल्ली दरबारी तक्रार केली आहे.
श्रीमती मनीषा जाधव यांनी खोटे जातीचे दाखले सादर करून शासनाची फसवणूक करून JNPT मध्ये नोकरी मिळविली आहे. अश्या प्रकारच्या अनेक तक्रारी सर्व स्तरातून केल्या आहेत. परंतु जेएनपीटी प्रशासन श्रीमती मनीषा जाधव यांना पाठीशी घालत आहे. सर्व ठोस पुरावे सादर करून ही कारवाई करण्यास जाणीवपूर्वक काना डोळा करत आहेत. मुख्य तक्रारदार प्रमोद ठाकूर यांनी तक्रार करून तीन महिने उलटून गेले आहेत आणि ॲड निशांत घरत यांनी 15 दिवस आमरण उपोषण केले. या उपोषणाला सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता.हे उपोषण सोडवण्यासाठी जेएनपीटी प्रशासनाने दिलेल्या पत्रातील आश्वासने पूर्ण होताना दिसत नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून प्रमोद ठाकूर, निशांत घरत, काशिनाथ गायकवाड, मनीष कातकरी यांनी दिल्ली दरबारी तक्रार नोंदविली आहे. त्यामध्ये पंतप्रधान कार्यालय, शिपिंग मिनिस्ट्री, सेंट्रल विजीलन्स कमिशन , सामाजिक न्याय मंत्रालय, अश्या अनेक विभागाच्या प्रधान सचिव यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आत्ता श्रीमती मनीषा जाधव यांचे निलंबन तर होणारच आहे परंतु कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी ज्या अधिकाऱ्यांनी हेतू पुरस्सर वेळ काढू पणा केला आहे. त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई होणार हे नक्की. ॲड निशांत घरत हे उच्च न्यायालयात जावून श्रीमती मनीषा जाधव यांचे दाखले कसे खोटे आहेत हे सिध्द करून त्यांना भारतीय दंड संविधान अंतर्गत कमीत कमी सात वर्ष कारावासाची शिक्षे साठी याचिका दाखल करणार आहेत. तसेच जे अधिकारी त्यांना पाठीशी घालून वेळ काढू पणा करत आहेत. त्यांना केंद्रीय दक्षता विभागाच्या
(C.V.C.) मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्याबद्दल जी शिक्षा होवू शकते त्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. आत्ता जे होईल ती आर या पार ची लढाई असणार हे निश्चित. श्रीमती मनीषा जाधव यांचे जातीचे दाखले खोटे आहेत हे आत्ता संपूर्ण जगाला समजले असून हे अलिबाग सत्र न्यायालयात तर सिध्द झालेलेच आहे. मुंबई हायकोर्टात देखील ते एका सुनावणीत सिद्ध होईल. त्यामुळे श्रीमती मनीषा जाधव यांची आता सुटका नाही.हे निश्चित आहे. आत्ता त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना कायदेशीर अद्दल घडवायचीच असा पक्का निर्धार तक्रारदार प्रमोद ठाकूर, ऍड. निशांत घरत, काशिनाथ गायकवाड आणि मनिष कातकरी यांनी बोलून दाखविला आहे.त्यामुळे आता पुढे काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.