लोकदर्शन 👉 अशोककुमार भगत
———————- ——————
स्वतंत्र भारताची सार्वभौम अशी राज्यघटना परमपूज्य डॉ. बाबासाहेबांनी लिहिली व या घटनेच्या आधारे देशाला मार्गदर्शन करणारी, नियंत्रित करणारी, संपूर्ण देशाचा विकास घडवून आणणारी, देशातील सर्व जाती, धर्म, पंथ, लिंग भेद आशा भेदभावपासून संरक्षण दिले. अशा या महामानवाला आज जयंती निमित्त अभिवादन करतांना मला अतीव आनंद होत असल्याचे प्रतिपादन गडचांदूरचे माजी प्रभारी सरपंच तथा विद्यमान नगरसेवक शेख सरवरभाई यांनी केले.
गडचांदूर येथील बाबसाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास हारार्पण केल्यानंतर शेख सरवरभाई पत्रकारांशी अन्नोपचारिक चर्चेत त्यांनी आपली ही भूमिका विशद केली.
बाबासाहेब हे भारतातील सर्वसमाजाचे मार्गदाते असून मी मुस्लिम समाजाचा असतानाही या रॅलीत सहभागी होतो, यावरून आपण समजून घ्या! विशेष म्हणजे, मी शिवसेनेचा नगरसेवक आहे! यावरून आमची भूमिका स्पष्ट होते.
यावेळी कोरपना तालुका प्रेस क्लब चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार अशोककुमार भगत, एम. आय. एम. चे शहर अदयक्ष शेख मुन्ना तसेच सहकाऱ्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास मालार्पण करून विनम्र अभिवादन केले.
दरम्यान, आज दिवसभर गडचांदूरात भीमजयंतीचे विविध कार्यक्रम पार पडले. सकाळी संयुक्त जयंती उत्सवाचे अध्यक्ष प्रा. किर्तीकुमार करमणकर यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ उपस्थिताना बुद्ध वंदना
दिल्यानंतर विशाल बाईकरॅली ला प्रारंभ झाला. गडचांदुर भ्रमण करून या रॅलीचा पुतळ्याजवळ समारोप झाला. सायंकाली सात वाजता विशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गडचांदुरातील हजारो भीमअनुयायी सहभागी झाले. रॅलीतील विविध झंकी पाहण्यासाठी सारे गडचांदूरकर एकवटल्याचे दिसत होते. या विशाल रॅलीचा शेवटी पुतळ्याजवळ समारोप झाला.
यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. हेमचंद दुधगवळी, प्रा. खैरे, विश्वास विहिरे, दशरथ डांगे, राहुल उमरे, देवानंद मुन व सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.