लोकदर्शन 👉 महादेव गिरी!
वालुर येथे श्री भगवान महाविर यांचा 2621 वा जन्म कल्याणक महोत्सव उत्सवात साजरा करण्यात आला यावेळी श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर संस्थान,वालुर येथून सकाळी 8 वाजता श्री भगवान महाविर यांच्या प्रतिमेची मिरवणुक काढण्यात आले या मिरवणूकीस श्रावक व श्राविका उपस्थित होते…..जेन मंदिरा पासून मिरवणुक बाजार मैदान येथे येवून महाविर चौकात मानसस्तंभाची पुजा करण्यात आली..व नंतर मंदिर मध्ये मिरवणुकीचे विसर्जन होवून मंदिर मध्ये भगवंताचा अभिषेक होवून भगवंताचा पाळणा मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला व तद्नंतर महाप्रसादाचा कार्यक्र पार पडला यावेळी जैन समाजातील श्रावक श्री बापुराव परभणकर, सुरेश सिनगारे, मधुकर चोभे, धन्यकुमार पालंबे, सुखानंद चोभे, पवन सिनगारे, कुमार पालंबे, लक्ष्मीकांत बेंडसुरे, दिपक सिनगारे,संतोष चोभे कोंडीचंद सिनगारे, रमेश चोभे, रमेश सिनगारे, प्रदिप सिनगारे, नेमीनाथ मोहारे, सुशिल बेंडसुरे, नितिन मोहारे, बाळू मोहारे, बाबुराव मोहारे, महाविर बेंडसुरे,महाविर दुट्टे, नंदकिशोर पुंड आदीनी परिश्रम घेतले.