लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
*⭕अर्थ संस्थे कडून चंद्रपुर जिल्ह्यातील अतिदुर्गम जीवति आणि कोरपना या तालुक्यात आरोग्याबाबत जनजागृति*
*गडचान्दुर:-*
अर्थ (एजुकेशन एक्शन रिसर्च इन ट्राइबल हेल्थ) चे संचालक तथा समाजसेवक डॉ कुलभूषण मोरे याना या वर्षीचा MSME आयुष मंत्रालय दिल्ली तथा आयुष इंटरनेशनल मेडिकल एसोसिएशन यांच्या तर्फे या वर्षीचा *आयुष इंटरनेशनल विदर्भ गौरव पुरस्कार 2022* ने शेगाव येथे कैबिनेट मंत्री यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे . विविध क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक कार्य करणार्या व्यक्तीना हा पुरस्कार दिल्या जातो. डॉ कुलभूषण मोरे यानी अर्थ च्या माध्यमातून चंद्रपुर जिल्यातिल जीवति आणि कोरपना या अतिदुर्गम आदिवासी भागात मिशन आरोग्य स्वराज ची सुरवात 2014 मधे केलि होती….कारण या भागात आरोग्याचे अनेक प्रश्न होते .. याचा अभ्यास डॉ कुलभूषण मोरे यानी या आधीच एका संशोधनात केला होता….. याचाच एक भाग प्रत्येक गावात आरोग्यदूत तैयार केले आणि त्याना प्राथमिक आरोग्याबाबत प्रशिक्षण दिले. गावातील वयक्तिक स्वछता , हैण्ड वाश , पानी स्वच्छ करून पिने , साथरोग प्रतिबंधक उपाय , कुपोषण या सर्वबदल आरोग्यदूत मार्फ़त गावा मधे जनजागृति करण्यात आली … या सोबतच डॉ कुलभूषण आणि त्याची पत्नी डॉ नंदिनी हे सध्या गडचान्दुर येथे अर्थ क्लिनिक च्या माध्यमातुन या भागात प्राथमिक आरोग्य सेवा देत आहेतच …
अर्थ संस्थे ने सन 2019 पासून सखी स्वराज्य अभियान हा मासिक पाळी स्वच्छता आणि महिला आरोग्य जनजागृति कार्यक्रम राबविला होता या अंतर्गत 150 गावात या विषयावर जनजागृति करण्यात आली आणि कापडी सैनेटरी नैपकिन्स तयार करून महिलाना देण्यात आल्या ….
मागील वर्षी कोरोना या महाभयंकर साथरोगाच्या संकटात जीवति आणि कोरपना या तालुक्यातील विविध गावामधे कोरोना बाबत जनजागृति करण्यात येत आहे …सोबतच प्रत्येक गावातील आरोग्यदुत आणि आरोग्यसखी यानी गावातच स्वत कापड़ी मास्क तैयार करून सर्व गावकार्याना मोफत वितरण केले …… अर्थ ने मास्क साठी कापड पुरविले , या करीता विविध संस्थेंची मदत मिळाली .
तसेच सोशल डिस्टन्स, हैण्ड वाश , मास्क वापरण्याचे नियम , पोषक आहार , सेल्फ क्वारंटाइन , गावातील प्रतिबंधात्मक उपाय योजना या विषयी माहिती देऊन जनजागृति करण्यात आली …आणि 3000 मास्क वितरण करण्यात आले .
अर्थ चे मिशन आरोग्य स्वराज्य अंतर्गत जिवती तालुक्यातील अतिदुर्गम गावा मधे या महिन्या पासून मिशन संजीवनी पोषण अभियान हे कुपोषण मुक्ति अभियान राबवत आहे ….या अंतर्गत अर्थ फाउंडेशन कडून लोकसहभागातुन तालुक्यातील कुपोषित बालकाना मोफत आहार पोषण किट वितरण करण्यात येणार आहेत . तसेच कुपोषण नीर्मुलना करिता जनजागृति करण्यात येणार आहे
अर्थ च्या माध्यमातून करत असलेल्या एका छोट्याश्या प्रयत्नाने आज विविध गावातील लोकाना आरोग्य स्वछता पोषण याचे महत्व पटत आहे याचे समाधान वाटते आणि हे लोकसहभागातुन सुरु झालेले मिशन आरोग्य स्वराज्य सुरूच राहणार आहे …… या प्रसंगी अर्थ फाउंडेशन ला विविध स्वरूपात मदत करण्याचे आव्हाहन डॉ भूषण मोरे यानी केले आहे .
,,