लोकदर्शन 👉 मोहन भारती
-
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे ,समानता आणि सत्यासाठी देह झिजवणारे ,बहुजनांचे उद्धारक ,सत्यशोधक समाजाचे संस्थापक व थोर विचारवंत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती स्थानिक महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका तथा प्राचार्या सौ.स्मिता चिताडे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,उपप्राचार्य विजय आकनूरवार,पर्यवेक्षक एच. बी. मस्की, शोभा जीवतोडे, एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा अशोक डोईफोडे होते.
सर्वप्रथम क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
उपप्राचार्य विजय आकनूरवार यांनी प्रास्ताविक मधून महात्मा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे संचालन प्रा सुधीर थिपे यांनी केले, तर आभार प्रदर्शन वाम टेकाम यांनी केले.
याप्रसंगी शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सफलते साठी आयोजन समितीच्या सदस्यांनी मेहनत घेतली