लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,,
गोंडवाना विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांना सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकार व राज्य शासनाच्या पहिल्या हप्त्याची थकबाकी देण्यात यावी अशी मागणी गोंडवाना यंग टीचर्स संघटनेने नागपूर विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण) डॉ.संजय ठाकरे यांच्याकडे केली आहे
अनुदानित महाविद्यालय व व कृषी विद्यापीठातील शिक्षक कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र शासन व राज्य शासनाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम अदा करावी यासंदर्भात शासनाने दि. 20-5-2021 च्या शासन निर्णयानुसार मान्यता दिलेली आहे. मात्र गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रातील शिक्षकांना अजून पावेतो 7 व्या वेतन अयोगानुसार पहिल्या हप्त्याची थकबाकी प्राप्त झाली नाही
विशेष म्हणजे नांदेड, कोल्हापूर, पनवेल,जळगाव येथील विभागीय सहसंचालक कार्यालयाकडून मागेच सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम करण्यात आली. या पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीने नागपूर विभागीय सहसंचालक डॉ.संजय ठाकरे यांची आज गोंडवाना विद्यापीठात भेट देण्यात आली.या भेटीदरम्यान सहसंचालक डॉ.संजय ठाकरे यांनी अतिशय सकारात्मक पणे भूमिका समजून घेऊन येत्या दहा दिवसात सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम केली जाईल असे आश्वासन दिलेआहे.यावेळी गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे, सचिव डॉ. विवेक गोरलावर,उपाध्यक्ष डॉ.नंदाजी सातपुते ,सहसचिव डॉ .प्रमोद बोधाने, विभाग समन्वयक डॉ. राजेंद्र गोरे,डॉ.अभय लाकडे,डॉ.किशोर कुडे,डॉ. अनिल चहांदे,डॉ.शरद बेलोरकर इत्यादी संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.