लोकदर्शन 👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,
गड़चांदूर..
माणिकगड सिमेंट इंग्लिश स्कूल गडचांदुर येथे प्रयोगशाळा परिचर पदी कार्यरत असलेले अशोक
मोटेवार 39 वर्षाची दीर्घ सेवा झाल्या नंतर सेवानिवृती निमित्त निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती अर्चना गोलचा होत्या. सुरुवातीला विद्यालयाच्या वतीने अशोक मोटेवार व श्रीमती मोटेवार यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्राचार्या अर्चना गोलचा यांनी अशोक मोटेवार यांनी प्रयोगशाळा परिचर म्हणून विद्यालयात 39वर्षांची दीर्घकाळ दिलेल्या सेवेची मुक्तकंठाने प्रशंसा केली. तसेच भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पवन बेले, देवेंद्र पटले व संजय भटकर या शिक्षकांची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयातील कला शिक्षक पवन महादुरकर यांनी अशोक मोटेवार यांचे रेखाटलेले रेखाचित्र उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.
श्रीमती मानंदा रामटेके यांच्या बहारदार सुत्रसंचालनाने कार्यक्रम विशेष रंगतदार झाला.
अशोक मोटेवार यांनी आपल्या भाषणातून सेवा काळातील काही आठवणींचा आढावा घेत विद्यालय, प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका व सर्व कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल, स्नेह सौहार्दाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मोरेश्वर भांगे यांच्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाला विद्यालयाच्या प्राचार्या, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांची उपस्थिती लाभली.