लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
महिला ही प्रत्येक क्षेत्रात आपली प्रगती करत आहेत, मग ते शिक्षण असो की खेळ. गावातील महिलांनी सुद्धा पुढे येऊन आपल्याला सिद्ध केले पाहिजेत त्यांच्यात असलेल्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजेत व कुठे तरी त्यांना स्वतंत्र जगता आले पाहिजेत, या अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेयर फाऊंडेशन, आवारपूर च्या चेअरपर्सन राजश्री बिर्ला मँडम यांच्या संकल्पनेला साकार करण्याकरीता अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर व्दारा त्यांना संधी आणि जागा उल्हासोत्सव, २०२२ ग्रामीण महिला खेळ कुद महोत्सव व्दारा उपलब्ध करून देण्यात आली. या दोन दिवसीय कार्यक्रमात अल्ट्राटेक कंपनी, आवारपूर च्या सभोवतालील १२ गावातील एकूण ३६० महिलांनी सहभाग घेतला होता. या १२ गावामध्ये आवारपूर, बीबी, नांदा, नोकारी, पालगाव, राजुरगुडा, कोल्हापूर गुडा, तळोधी, बखर्डी, भोयेगाव, हिरापुर व सांगोडा या गावांचा समावेश होता.
उल्हासोत्सव – २०२२ या कार्यक्रमात महिलांकरिता कबड्डी, थ्रो- बाल, रस्सा खेच, १०० मीटर धावणे, लिंबू चमच, व सँक रेस या खेळाचा सहभाग होता. तसेच विशेष आकर्षण म्हणून बैलबंडी झांकी व समुह नुत्य यांचा सुद्धा समावेश होता.
प्रथम दिवशी प्रमुख पाहुणे अल्ट्राटेक सिमेंट कंपनी, आवारपूर चे युनिट हेड, श्रीराम पी.एस. यांचे स्वागत बैलबंडी वरती स्थानापण करून महाराजा बँड व सापा लावून करण्यात आले. सर्व गावातील महिला सरपंच यांनी मराठमोक्या पद्धतीने टिका-आरती व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. युनिट हेड व्दारा व्यवस्थापक कर्नल दिपक डे यांच्या मार्गदर्शनात उल्हासोत्सव – २०२२ चा झेंडा फडकविण्यात आला. त्यानंतर मशाल प्रज्वलित करण्यात आली.
सर्व १२ ही गावांतील प्रमुख पाहुणे व दर्शकासमोर बैलबंडी झांकी द्वारा विविध मुद्यावरती संदेश दिला. लगेच सर्व महिला खेळाडू कडून खेळांच्या नियमांची शपथ घेण्यात आली. व नंतर युनिट हेड, श्रीराम पी.एस. यांच्याद्वारे खेळ सुरू करण्यास अनुमती देत कबड्डी व थ्रो – बाल चा टास करण्यात आला.
कार्यक्रमाच्या दुसर्या दिवशी कबड्डी, थ्रो-बाल, १०० मीटर धावणे, रस्सा खेच, सँक रेस, लिंबू चमच या सगळ्या खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या.या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता सीहांचा वाटा असणाऱ्या सर्व गावातील सरपंच व उपसरपंच यांना युनिट हेड द्वारा शाल देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष करून या कार्यक्रमाला सी. एस. आर. व्यवसाय प्रमुख शिव संत्रा साहेब याची. प्रामुख्याने उपस्थिती होती. त्यांनी सर्व खेळाडू व दर्शक यांना संबोधित केले. युनिट हेड श्रीराम पी.एस. यांनी बोलतानी म्हटले की, गावांतील महिलांना पुढे वाटचाल करण्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी आणि चांगल्या विचारांच्या देवाण-घेवाणीसाठी ह्या कार्यक्रमाचा मोलाचा फायदा होईल, सी. एस. आर. आवारपूर यांनी सभोवतालील गावांत केलेल्या कार्याची स्तुती सुद्धा करण्यात आली, यानंतर सुद्धा आम्ही गावाच्या प्रगतीसाठी कार्य करू असे आश्वासन सुद्धा दिले व या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता सहकार्य लाभलेल्या सर्व १२ ग्रामपंचायत तसेच खेळाडू व गावकरी आणि सर्व विभागांची स्तुती सुद्धा केली.
कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात संस्कृतीक समूह नृत्य यांनी सर्व प्रमुख पाहुणे व दर्शक यांचे मन मोहुन घेतले. यात या वर्षी १२ गावाव्यतिरिक्त लोडर रामनगर येथील दोन संघाचे सुद्धा समूह नृत्य केले. सर्व वीजेता संघ तसेच विजेता चमू यांना उपस्थित महिला प्रमुख पाहुणे तसेच फंक्शन हेड, संदीप देशमुख, ललित देवपुरा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. सहकार्य करण्यात आलेल्या मॅजिक बस फाऊंडेशन च्या सर्व कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. या वर्षी ओवर आल चॅम्पियनशिपमध्ये दुसरा क्रमांक राजूरगुडा तर प्रथम पुरस्कार आवारपूर गावांना युनिट हेड द्वारा प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आभार आभार प्रदर्शन कर्नल दीपक डे यांच्या द्वारा करण्यात आले.
या कार्यक्रमाला महिला बचत गट यांनी बनविलेल्या साहित्याचे प्रदर्शन करण्यात आले तसेच पदार्थाचे स्टाल सुद्धा लावण्यात आले.
सर्व ३६० खेळाडूंना खेळांचे ड्रेस त्यांच्या गावांच्या नावासोबत सी.एस.आर. तर्फे प्रदान करण्यात आले तर सर्व खेळाडू ना येण्या व जाण्याकरीता गाडीची व्यवस्था तसेच चाय, नाश्ता, लिंबूपाणी व भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून युनिट हेड, श्रीराम पी.एस., संदीप देशमुख, ललित देवपुरा,सी.एस.आर. व्यवस्थापक प्रमुख शिवसंत्रा, संजय पेटकर, सोनाली गवारगुर सर्व ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच तथा सदस्य आणि सर्व विभाग प्रमुख आणि त्यांचा परिवार सुद्धा उपस्थित होता.
उल्हासोत्सव महिला खेल-कूद महोत्सव- २०२२ ला यशस्वी करण्याकरिता कर्नल दिपक डे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तर उल्हासोत्सवला यशस्वी करण्याकरीता सी.एस.आर. अँडमीन, सेक्य़रीटी, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, हार्टीकलचर, ए.बी.पी.एस.टीचर स्टॉप, मेडीकल सेंटर, माईन्स, सेफ्टी, इ. आर यांचे मोलाचे सहकार्य राहिले.
पंच म्हणून प्रमोद वाघाडे, किरण त्रीमोती, किशोर उरकुडे व मॅजिक बस यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे नियोजन सी.एस.आर. प्रमुख सतीश मिश्रा, सचिन गोवारदीपे, संजय ठाकरे व देविदास मांदाळे यांनी केले.
,