. लोकदर्शन 👉 राहुल खरात
⭕दै. तुफान क्रांतीने 10 शिक्षकांना केले सन्मानीत.
दैनिक तुफान क्रांतीच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त सांगोला येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात भन्नाट भिंगरी चित्रपटाची अभिनेत्री आशा सुरपुर यांच्या शुभहस्ते तसेच, करूणाताई धन॔जय मुडे, तहसिलदार अभिजीत पाटील, सुधाकर मागाडे, मिलींद गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत घरगुती शाळा उपक्रम राबवणाऱ्या विविध शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
‘ घरोघरी शाळा ‘ हा उपक्रम ज्या केंद्रातून उदयास आला त्या दहिवडी केंद्राचे केंद्रप्रमुख मा.नारायण विष्णू आवळे तसेच नेवासा तालुक्यातील सौ. मनिषा कैलास धनापुणे, अहमदनगरच्या श्रीम. मनिषा वसंत बनकर , श्रीम. सुरेखा विठ्ठल गर्जे , श्रीम. संगिता शंकराराव बनकर, मोरे ,श्रीम.मनिषा नरेंद्र बोर्डे (कदम ), सातारा जिल्ह्यातील श्रीम. शिल्पा संपत खरात , राहुरीच्या श्रीम. दिपाली जितेंद्र पतंगे , कोल्हापूर जिल्ह्यातील सुजाता मानसिंग मोरे यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन राज्यस्तरीय आदर्श सेवा सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील आदर्श शिक्षक श्री. संजय खरात यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या ‘घरोघरी शाळा’ या उपक्रमाच्या माध्यमातून राज्याच्या विविध भागातील शिक्षकांनी कोरोना कालावधीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी स्वखर्चाने स्वतंत्र शाळा तयार केल्या. घरी तयार केलेल्या शाळेत नियमित गृहभेटी देवून कोविड काळातही विद्यार्थ्याचे शिक्षण प्रभाविपणे सुरु ठेवले. जिथं मोबाईलला नेटवर्क नाही, ज्यांची मोबाईल घेण्याची आर्थिक स्थिती नाही अशा ग्रामीण भागातील हजारो मुलांना सदर उपक्रमाचा लाभ झाला. सदर शिक्षकांनी केलेल्या कार्याची दखल घेवून दैनिक तुफान क्रांतिकडून राज्यस्तरीय आदर्श सेवा सन्मान पुरस्काराने सदर शिक्षकांना सन्मानीत करण्यात आले.