लोकदर्शन 👉मोहन भारती
राजुरा ( :– अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण संघ जिल्हा शाखा चंद्रपूर यांनी क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्याकडे निवेदन देऊन अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात असलेल्या समस्या सोडविण्यासाठी विनंती केली होती. यानुसार राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी संबंधित विभागासमोर प्रश्न उपस्थित करून अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या बदल्या संदर्भातील अडचणी दूर करून त्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
जिल्हा परिषदेतील शिक्षकांना जिल्हांतर्गत बदली करीत दिनांक ०७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयातील सुचनेनुसार जिल्हा परिषद चंद्रपूरचे दिनांक ०४/०३/२०२२ ला १२४ शाळा/ गावाची यादी अवघड क्षेत्र म्हणुन घोषीत केली आहे. यापूर्वी जिल्हा परिषद चंद्रपूरचे दिनांक २०/०५/२०१९ ला ३३२ शाळा/गावाची यादी अवघड क्षेत्र व ६३ शाळा/गाव महिलाकरीता दुर्गम व अतिदुर्गम क्षेत्र म्हणुन यादी जाहीर केली होती. त्यानुसारच जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या. माहे फेब्रुवारी २०२२ रोजी जिल्हा परिषद चंद्रपूरने ४०७ शाळा/गावाची यादी अवघड क्षेत्र म्हणुन संभाव्य यादी जाहीर केली होती. यावर आक्षेप मागीतले असल्याचे व इतर बाबी अवलोकनार्थ निवेदनात नमूद आहे. तरी माहे फेब्रुवारी 2022 मध्ये 407 गावाची अवघड क्षेत्र म्हणून घोषित केलेली यादी कायम ठेवावी व या व्यतिरिक्त निकष पूर्ण करणारे गावाचा समावेश करावा अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी आमदार धोटे यांनी केली आहे.