लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*⭕सिध्दबली उद्योगातील पूर्व कामगारांच्या न्याय मागण्यांाबाबत सकारात्मक चर्चा*
चंद्रपूर – सिध्दबली उद्योगातील पूर्व कामगारांचे थकीत वेतन, गॅच्युईटी व अन्य देय राशी बाबत प्रलंबित प्रश्न समोपचाराने सोडविण्याकरीता पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या सुचनेनुसार दि. 24 मार्च रोजी सहायक कामगार आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत सिध्दबली व्यवस्थापन, पूर्व कामगार व त्यांचे प्रतिनिधी यांची कामगार आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत पूर्व कामगारांना व्यवस्थापनाव्दारे देण्यात येणारी राशी न्यायपूर्ण नसल्याने वेतन, गॅ्रच्युईटी व अन्य देय राशी मिळवून रू. 5 लाख सामायीक राशी व्यवस्थापनाने या पिडीत कामगारांना द्यावी अशी मागणी करण्यात आली. या बैठकीमध्ये दोन्ही पक्षांकडुन सकारात्मक चर्चा पार पडली.
सहायक कामगार आयुक्त श्रीमती भोईटे यांनी या प्रकरणात मध्यम मार्ग काढण्याची सुचना सिध्दबलीचे अधिकारी श्री. अभय सिंग यांना या बेठकीत केली. सिध्दबलीतील पूर्व कामगारांनी आपल्या न्याय मागण्यांकरीता 25 मार्च रोजी कंपनीच्या प्रवेशव्दारासमोर आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती. कामगार आयुक्तांनी या कामगारांना आदोलनापासून परावृत्त व्हावे असे सांगत चर्चेतून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे हे प्रस्तावित आंदोलन काही दिवसांकरीता स्थगीत करण्यात येईल असे कामगारांच्या प्रतिनिधींनी बैठकीदरम्यान सांगीतले.
मागील वर्षभरापासून सिध्दबलीचे हे पूर्व कामगार चर्चा, भेटीच्या माध्यमातून आपल्या न्याय मागण्यांसाठी शांततेचा अवलंब करून संघर्ष करीत आहेत. व्यवस्थापनाने त्यांच्या सहनशिलतेचा आणखी अंत न पाहता कामगारांच्या विधायक मागण्यांची तातडीने सोडवणुक करावी अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त केली. कामगार आयुक्त महोदयांनी या प्रश्नात हस्तक्षेप करून पूर्व कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती कामगारांनी यावेळी केली. सदर बैठकीस सर्वश्री उत्तम आमडे, विनोद खेवले, विजय आगरे, मुन्ना कुशवाह, अमोल झोडे, सचिन विरूटकर यांचेसह कामगार बांधव उपस्थित होते.