महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या गुढीपाडवानिमित्त सोडतीच्या तिकीट विक्रीचा शुभारंभ; १२ एप्रिल रोजी सोडत। लोकदर्शन

लोकदर्शन 👉 राहूल खरात

⭕पहिल्या सामायिक (हमीपात्र) बक्षिसाचा क्रमांक विक्री झालेल्या तिकीटांमधूनच काढण्यात येणार

मुंबई

दि 24: महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या गुढीपाडवानिमित्त सोडतीच्या तिकीट विक्रीचा शुभारंभ राज्य लॉटरी आयुक्त अनिल भंडारी यांच्या हस्ते झाला.

नवीन प्रशासकीय इमारत येथे हा कार्यक्रम झाला. 12 एप्रिल 2022 रोजी सायं. 04.00 वाजता सोडत असून एकूण बक्षिसांची संख्या 8602 आहे. पहिले सामायिक (हमीपात्र) बक्षिस रू.51,00,000/- असून, तिकीटांची किंमत रू. 200/- आहे. एकूण बक्षिसांची रक्कम रू. 98,55,000 आहे. पहिले सामायिक (हमीपात्र) बक्षिसाचा क्रमांक विक्री झालेल्या तिकीटांमधूनच काढण्यात येईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

यावेळी अवर सचिव तथा उपसंचालक, राज्य लॉटरी, श्री. प्रशांत पाटील, उपसंचालक (वित्त व लेखा), श्रीमती आशा ठोंबरे, कक्ष अधिकारी तथा राज्य लॉटरी श्रीमती शीला यादव, लेखा अधिकारी संदेश ओव्‍हाळ, सहायक राज्य लॉटरी अधिकारी सुनिल लोटणकर, तसेच विविध लॉटरी संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी सर्वश्री गणेश कदम, चंद्रकांत मोरे, दिलीप धुरी, सुहास महाडीक , रमाकांत आचरेकर, विलास सातार्डेकर व सुरेश भगत, प्रमुख लॉटरी विक्रेते श्री. मनिष शहा, उपस्थित होते. विलास सातार्डेकर, संस्थापक-अध्यक्ष, महाराष्ट्र लॉटरी विक्रेता सेना यांनी शुभारंभप्रसंगी 1000 तिकीटे खरेदी केली. याप्रसंगी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व लॉटरी तिकीट वितरक यांनी गुढीपाडवा भव्यतम सोडतीच्या लॉटरी तिकीटांची शंभर टक्के विक्री करण्याचे आश्वासन दिले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *